S M L

परांजपे-शिवसेनेच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली

09 ऑगस्टडोंबिवलीतील भागशाळा मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्यावरुन शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या वादाला पोलिसांनी फुलस्टाप लावला आहे. एकाच मैदानावर होणार्‍या या दोन्ही दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली असून नागरिकांच्या सुरक्षेतचा मुद्दा लक्षात घेत 144 जमावबंदी कलम लागू करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीचे पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी ही माहिती दिली आहे. परांजपेंच्या दहीहंडीला शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. यावर तोडगा काढत पालिकेच्या आयुक्तांनी दोन्हीही दहीहंडी होऊ द्या असा निर्णय दिला होता पण यावर पोलिसांनी नकार दिला आहे. आयुक्ताचा तोडगा पाण्यातखासदार आनंद परांजपे यांना डोंबिवलीतील भागशाळा मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्यावरुन झालेल्या वादावर आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी यावर तोडगा काढला होता. भागशाळा मैदानात यंदा दोन दहीहंडी होतील. आयुक्तांनी खासदार परांजपे आणि शिवसेनेलाही दहीहंडी उत्सवासाठी परवानगी दिली होती. परांजपेंच्या दहीहंडीवरुन क.डों.पालिकेत शिवसैनिकांचा राडाडोंबिवलीतील शिवसेनेचे खासदार आनंद परांजपेंच्या दहीहंडी उत्सवावरुन परवानगी देण्यावरुन कल्याण-डोंबिवली महापालिकेबाहेर तणावाचं वातावरण आहे. ही दहीहंडी शिवसेनेची आहे. यात आनंद परांजपे यांचा काहीही संबंध नाही. अशा घोषणा देत शिवसैनिकांनी पालिकेबाहेर गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी हस्तक्षेप केला पण पोलीस आणि शिवसैनिकामंध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी शिवसैनिकांना पालिकेबाहेर पिटाळलं. यावेळी महापौर वैजयंती घोलप यांना सुद्धा महिला पोलिसंानी आयुक्त कार्यालयाबाहेर काढलं. कोर्टाकडून परवानगी रद्दकाल बुधवारी या प्रकरणी आनंद परांजपे यांची दहीहंडी रद्द करण्यात आली. हायकोर्टाने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने दिलेले सर्व निर्णय हायकोर्टाने रद्द केले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन कोणाला दहीहंडीसाठी परवानगी द्यावी याबाबत बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा असं हायकोर्टाने आयुक्तांनी सांगितलं. सर्व आयोजकांनी नव्याने अर्ज दाखल करण्याचे आदेश आता हायकोर्टाचे दिले आहे. आनंद परांजपे दरवर्षी भागशाळा मैदानावर दहीहंडी आयोजित आयोजित करत असतात पण पालिकेच्या निवडणुकीत परांजपेंनी राष्ट्रवादींशी हातमिळवणी केल्यामुळे युतीने परांजपेंच्या दहीहंडीला विरोध केलाय. आता अखेर यावर तोडगा काढत होऊ द्या दोन दहीहंडी असा निर्णय आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे वाद निवळला असला तरी समोरासमोर असल्यामुळे भडका उडण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2012 02:55 PM IST

परांजपे-शिवसेनेच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली

09 ऑगस्ट

डोंबिवलीतील भागशाळा मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्यावरुन शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या वादाला पोलिसांनी फुलस्टाप लावला आहे. एकाच मैदानावर होणार्‍या या दोन्ही दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली असून नागरिकांच्या सुरक्षेतचा मुद्दा लक्षात घेत 144 जमावबंदी कलम लागू करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीचे पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी ही माहिती दिली आहे. परांजपेंच्या दहीहंडीला शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. यावर तोडगा काढत पालिकेच्या आयुक्तांनी दोन्हीही दहीहंडी होऊ द्या असा निर्णय दिला होता पण यावर पोलिसांनी नकार दिला आहे.

आयुक्ताचा तोडगा पाण्यात

खासदार आनंद परांजपे यांना डोंबिवलीतील भागशाळा मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्यावरुन झालेल्या वादावर आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी यावर तोडगा काढला होता. भागशाळा मैदानात यंदा दोन दहीहंडी होतील. आयुक्तांनी खासदार परांजपे आणि शिवसेनेलाही दहीहंडी उत्सवासाठी परवानगी दिली होती.

परांजपेंच्या दहीहंडीवरुन क.डों.पालिकेत शिवसैनिकांचा राडा

डोंबिवलीतील शिवसेनेचे खासदार आनंद परांजपेंच्या दहीहंडी उत्सवावरुन परवानगी देण्यावरुन कल्याण-डोंबिवली महापालिकेबाहेर तणावाचं वातावरण आहे. ही दहीहंडी शिवसेनेची आहे. यात आनंद परांजपे यांचा काहीही संबंध नाही. अशा घोषणा देत शिवसैनिकांनी पालिकेबाहेर गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी हस्तक्षेप केला पण पोलीस आणि शिवसैनिकामंध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी शिवसैनिकांना पालिकेबाहेर पिटाळलं. यावेळी महापौर वैजयंती घोलप यांना सुद्धा महिला पोलिसंानी आयुक्त कार्यालयाबाहेर काढलं.

कोर्टाकडून परवानगी रद्दकाल बुधवारी या प्रकरणी आनंद परांजपे यांची दहीहंडी रद्द करण्यात आली. हायकोर्टाने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने दिलेले सर्व निर्णय हायकोर्टाने रद्द केले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन कोणाला दहीहंडीसाठी परवानगी द्यावी याबाबत बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा असं हायकोर्टाने आयुक्तांनी सांगितलं. सर्व आयोजकांनी नव्याने अर्ज दाखल करण्याचे आदेश आता हायकोर्टाचे दिले आहे. आनंद परांजपे दरवर्षी भागशाळा मैदानावर दहीहंडी आयोजित आयोजित करत असतात पण पालिकेच्या निवडणुकीत परांजपेंनी राष्ट्रवादींशी हातमिळवणी केल्यामुळे युतीने परांजपेंच्या दहीहंडीला विरोध केलाय. आता अखेर यावर तोडगा काढत होऊ द्या दोन दहीहंडी असा निर्णय आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे वाद निवळला असला तरी समोरासमोर असल्यामुळे भडका उडण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2012 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close