S M L

पाकमध्ये अत्याचाराला कंटाळून 250 हिंदू भारतात परतले

10 ऑगस्टपाकिस्तानमधील वास्तव्य करणार्‍या तब्बल 8 हजार हिंदूना पाकभूमीचा कंटाळा आला आहे. आपल्या मायदेशी भारतात परतण्याची इच्छा त्यांनी बोलवून दाखवली आहे. आज जवळपास अडीचशे पाकिस्तानी हिंदुंना भारतात येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पाकिस्तानातल्या अनेक हिंदूंना भारतात यायचं आहे. भारत सरकारने आपल्याला भारतात राहण्याची परवानगी द्यावी अशी त्यांची इच्छा आहे. पाकिस्तानातून भारतात येणार्‍या 250 हिंदुना व्हिसा असूनही वाघा सीमेवर अडवण्यात आलं. सुरक्षेच्या कारणांमुळे त्यांना भारतात जाण्यापासून रोखल्याचं अधिकारी सांगत आहेत. अखेर 7 तासांनंतर त्यांना भारतात जायला परवानगी देण्यात आली. पाकिस्तानात होणार्‍या अत्याचाराला कंटाळून अनेक हिंदू भारतात येत असल्याची चर्चा आहे. पण हा पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी म्हटलंय. पाकिस्तानातले हिंदू मात्र वेगळंच सांगताहेत.पाकिस्तानातल्या हिंदुंना अनेक अत्याचारांना सामोरं जावं लागत असल्याचं पाकिस्तानातल्या मंत्र्यांनीही कबूल केलंय. पण परिस्थिती सुधारत असल्याचंही ते सांगतात. पाकिस्तानी हिंदूंची व्यथा ?- पाकिस्तानातून भारतात आलेल्या 8 हजार हिंदूंना भारतात दीर्घकाळ राहण्यासाठी व्हिसा हवाय- सरकारी आकडेवारीनुसार गेल्या 10 महिन्यांत पाकिस्तानातल्या 400 हिंदू कुटुंब भारतात आलेत- 2011 मध्ये फक्त 8 ते 10 पाकिस्तानी हिंदू कुटुंब भारतात आले होते- फाळणीवेळी पाकिस्तानात 15% हिंदू होते, ही संख्या आता 2 टक्क्यांवर आलीयभारत-पाकिस्तान यांच्यात विश्वासदृढतेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नात या समस्येकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 10, 2012 04:22 PM IST

पाकमध्ये अत्याचाराला कंटाळून 250 हिंदू भारतात परतले

10 ऑगस्ट

पाकिस्तानमधील वास्तव्य करणार्‍या तब्बल 8 हजार हिंदूना पाकभूमीचा कंटाळा आला आहे. आपल्या मायदेशी भारतात परतण्याची इच्छा त्यांनी बोलवून दाखवली आहे. आज जवळपास अडीचशे पाकिस्तानी हिंदुंना भारतात येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पाकिस्तानातल्या अनेक हिंदूंना भारतात यायचं आहे. भारत सरकारने आपल्याला भारतात राहण्याची परवानगी द्यावी अशी त्यांची इच्छा आहे.

पाकिस्तानातून भारतात येणार्‍या 250 हिंदुना व्हिसा असूनही वाघा सीमेवर अडवण्यात आलं. सुरक्षेच्या कारणांमुळे त्यांना भारतात जाण्यापासून रोखल्याचं अधिकारी सांगत आहेत. अखेर 7 तासांनंतर त्यांना भारतात जायला परवानगी देण्यात आली. पाकिस्तानात होणार्‍या अत्याचाराला कंटाळून अनेक हिंदू भारतात येत असल्याची चर्चा आहे. पण हा पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी म्हटलंय. पाकिस्तानातले हिंदू मात्र वेगळंच सांगताहेत.

पाकिस्तानातल्या हिंदुंना अनेक अत्याचारांना सामोरं जावं लागत असल्याचं पाकिस्तानातल्या मंत्र्यांनीही कबूल केलंय. पण परिस्थिती सुधारत असल्याचंही ते सांगतात.

पाकिस्तानी हिंदूंची व्यथा ?- पाकिस्तानातून भारतात आलेल्या 8 हजार हिंदूंना भारतात दीर्घकाळ राहण्यासाठी व्हिसा हवाय- सरकारी आकडेवारीनुसार गेल्या 10 महिन्यांत पाकिस्तानातल्या 400 हिंदू कुटुंब भारतात आलेत- 2011 मध्ये फक्त 8 ते 10 पाकिस्तानी हिंदू कुटुंब भारतात आले होते- फाळणीवेळी पाकिस्तानात 15% हिंदू होते, ही संख्या आता 2 टक्क्यांवर आलीय

भारत-पाकिस्तान यांच्यात विश्वासदृढतेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नात या समस्येकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2012 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close