S M L

डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'द ग्रेटेस्ट इंडियन'

11 ऑगस्टमहात्मा गांधींजीच्या नंतरच्या ग्रेटेस्ट इंडियन्सची शोध आता संपला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांची ग्रेटेस्ट इंडियन म्हणून लाखो भारतीयांनी निवड केली आहे. सीएनएन-आयबीएन, हिस्टरी चॅनलचा संयुक्त उपक्रमाने गेल्या दोन महिन्याभरापासून देशभरात मोहिम राबवण्यात आली होती. देशभरातून लाखो लोकांनी मिस्ट कॉल देऊन आपला ग्रेटेस्ट इंडियन निवडायचा होता. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वाधिक 2 कोटींपेक्षा जास्त मतं मिळाली आणि वादविदानंतर जनतेनं आपला 'ग्रेटेस्ट इंडियन' निवडला आहे. ;भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर.. लाखोंचे प्रेरणास्थान ... शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष कराचा नारा आंबेडकरांनी दिला. आणि आधुनिक भारतात भारतात सामाजिक संघर्षाची ठिणगी पडली. 1891 मध्ये मध्येप्रदेशात माहू इथं लष्करी छावणीत त्यांचा जन्म झाला. बालपणीचं त्यांना जातीव्यवस्थेचे चटके बसले. पण अत्यंत्य प्रतिभावान असलेल्या बाबासाहेबांनी हा अडसर दूर करत, मुंबई,अमेरिका आणि इंग्लंडमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यानंतर त्यांच्या सामाजिक संघर्षाला सुरुवात झाली. 1924 मध्ये त्यांनी 'बहिष्कृत हितकरणी सभा' स्थापन केली.. उद्देश होता दलितांमध्ये शिक्षण प्रसार आणि आर्थिक स्थर सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. 1927 मध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा सुरु केला. भारतीय जातीव्यवस्थेवर घणाघाती टीका करणारी पुस्तकंही लिहली. 1947 मध्ये त्यांनी भारताचे पहिले कायदे-न्यायमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. स्वतंत्र भारतासाठी एक सक्षम राज्यघटना तयार करण्याची जबाबदारीही त्यांनी पेलली. 1956 मध्ये त्यांनी आपल्या 5 लाख अनुयांयसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना 1990 मध्ये भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2012 03:44 PM IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'द ग्रेटेस्ट इंडियन'

11 ऑगस्ट

महात्मा गांधींजीच्या नंतरच्या ग्रेटेस्ट इंडियन्सची शोध आता संपला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांची ग्रेटेस्ट इंडियन म्हणून लाखो भारतीयांनी निवड केली आहे. सीएनएन-आयबीएन, हिस्टरी चॅनलचा संयुक्त उपक्रमाने गेल्या दोन महिन्याभरापासून देशभरात मोहिम राबवण्यात आली होती. देशभरातून लाखो लोकांनी मिस्ट कॉल देऊन आपला ग्रेटेस्ट इंडियन निवडायचा होता. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वाधिक 2 कोटींपेक्षा जास्त मतं मिळाली आणि वादविदानंतर जनतेनं आपला 'ग्रेटेस्ट इंडियन' निवडला आहे.

;

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर.. लाखोंचे प्रेरणास्थान ... शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष कराचा नारा आंबेडकरांनी दिला. आणि आधुनिक भारतात भारतात सामाजिक संघर्षाची ठिणगी पडली. 1891 मध्ये मध्येप्रदेशात माहू इथं लष्करी छावणीत त्यांचा जन्म झाला. बालपणीचं त्यांना जातीव्यवस्थेचे चटके बसले. पण अत्यंत्य प्रतिभावान असलेल्या बाबासाहेबांनी हा अडसर दूर करत, मुंबई,अमेरिका आणि इंग्लंडमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यानंतर त्यांच्या सामाजिक संघर्षाला सुरुवात झाली. 1924 मध्ये त्यांनी 'बहिष्कृत हितकरणी सभा' स्थापन केली.. उद्देश होता दलितांमध्ये शिक्षण प्रसार आणि आर्थिक स्थर सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. 1927 मध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा सुरु केला. भारतीय जातीव्यवस्थेवर घणाघाती टीका करणारी पुस्तकंही लिहली. 1947 मध्ये त्यांनी भारताचे पहिले कायदे-न्यायमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. स्वतंत्र भारतासाठी एक सक्षम राज्यघटना तयार करण्याची जबाबदारीही त्यांनी पेलली. 1956 मध्ये त्यांनी आपल्या 5 लाख अनुयांयसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना 1990 मध्ये भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2012 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close