S M L

घबराट आणि परतीची वाट

16 ऑगस्टआसाममध्ये दंगल आता आटोक्यात आली असली तरी या दंगलीचे पडसाद आता देशभरात उमटत आहे. मागिल शनिवारी मुंबईतील सीएसटी परिसरात या दंगलीचा निषेध करण्यासाठी निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. या हिंसाचारात 2 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच मुंबईसह,पुण्यात ईशान्य भागात राहणार्‍या लोकांना टार्गेट केले जात आहे. दोन दिवसांपुर्वी पुण्यात अज्ञात लोकांकडून मणिपुरीच्या तरुणांना मारहाण झाली. शहरात भावना भडकावणारे व्हिडिओ पसरवले जात आहे. या सगळ्याप्रकारमुळे आसामी लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. त्यामुळे ईशान्य भारतातून शिकायला आणि नोकरीसाठी आलेल्यांमध्ये भीतीचं वातवरण निर्माण झालंय. घाबरलेले हे हजारो लोक आपापल्या गावी परत जात आहेत. पुणे, नाशिक आणि पनवेलमधून मोठ्या प्रमाणावर हे लोक गुवाहाटीला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोचत आहेत.पुणे स्टेशनवर तर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. ईशान्य भारताकडे जाणार्‍या गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. या गाड्यांचं करंट बुकिंग अचानक वाढलंय. बंगळुरू आणि हैद्राबादमध्येही असंच चित्र आहे. पुणे पोलिसांनी काही वेळापुर्वीच पत्रकार परिषद घेऊन ईशान्य भारतीयांना सुरक्षा देण्याची हमी दिली. आम्हाला अपयश नाही आलंय, असा दावाही पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केलाय. राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. पोलीस बंदोबस्त वाढवला आणि शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, सोशल नेटवर्किंग साईट्सवरून प्रक्षोभक व्हिडिओ पसरवणार्‍यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. पुणे पोलिसांनी आता या व्हिडिओचा तपास सुरू केला आहे. यासंदर्भात फेसबुक, ट्विटर आणि गूगलसोबतच मोबाईल कंपन्यांशीही पोलिसांनी संपर्क साधलाय. प्रक्षोभक व्हिडिओ काढून टाकण्याची पोलिसांनी या कंपन्यांकडे मागणी केली आहे. सोशल साईट्सवरून पसरवल्या जात असलेल्या प्रक्षोभक व्हिडिओंमुळे ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांत घबराट पसरली आहे. तसेच पुण्यातलं वातावरण शांत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गुवाहाटीकडे जाणार्‍या गाड्यांनाही सुरक्षा पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यात असलेल्या ईशान्य भारतातल्या मुलांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आले आहे. पुण्यात प्रक्षोभक व्हिडिओ क्लिप्स पुण्यात प्रक्षोभक व्हिडिओ पसरवण्याचा प्रयत्न होतं आहे. एमएमएसच्या माध्यामातून काही भडकावू व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या जातायत.या क्लिप्समुळे भावना भडकवण्यात येतायत अशी माहिती सह पोलीस आयुक्त संजीव सिंघल यांनी दिली.त्यांनी मुस्लीम संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेतली. या क्लिप्स बद्दल त्यांना माहिती देऊन इतर लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी केलं. अनेक खोटी दृृश्य एकत्र करुन, ती आसाममधल्या घटनांची क्लीप म्हणून दाखवली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या क्लिप्स पाहुनच हे हल्ले घडले असून या संदर्भात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच या हल्ल्याप्रकरणी एकुण तेरा जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे : विद्यार्थ्यांसाठी हेल्पाईन मिझो स्टुडंट्स यूनियन 9762310520 8600955278 कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशन9096977715 9665925312 मणिपूर स्टुडंट्स युनियन 9960343965 9890736927 सरहद हेल्पलाईन 9921693175 9890432332 मेघालय स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह 9975925094 9975155426 झोमी स्टुडंट्स फेडरेशन 9766492304 8055769573 अरूणाचल स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशन 8600088463 9762943225 नागा स्टुडंट्स यूनियन 9890097458 9158830275'आयबीएन लोकमत'चं आवाहनआसाममधल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरल्या जातायतIBN लोकमचं सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी कुठल्याहीअफवांवर विश्वास ठेवू नये सामाजिक सलोखा राखणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे.अफवांवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखा

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2012 03:57 PM IST

16 ऑगस्ट

आसाममध्ये दंगल आता आटोक्यात आली असली तरी या दंगलीचे पडसाद आता देशभरात उमटत आहे. मागिल शनिवारी मुंबईतील सीएसटी परिसरात या दंगलीचा निषेध करण्यासाठी निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. या हिंसाचारात 2 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच मुंबईसह,पुण्यात ईशान्य भागात राहणार्‍या लोकांना टार्गेट केले जात आहे. दोन दिवसांपुर्वी पुण्यात अज्ञात लोकांकडून मणिपुरीच्या तरुणांना मारहाण झाली. शहरात भावना भडकावणारे व्हिडिओ पसरवले जात आहे. या सगळ्याप्रकारमुळे आसामी लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. त्यामुळे ईशान्य भारतातून शिकायला आणि नोकरीसाठी आलेल्यांमध्ये भीतीचं वातवरण निर्माण झालंय. घाबरलेले हे हजारो लोक आपापल्या गावी परत जात आहेत. पुणे, नाशिक आणि पनवेलमधून मोठ्या प्रमाणावर हे लोक गुवाहाटीला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोचत आहेत.

पुणे स्टेशनवर तर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. ईशान्य भारताकडे जाणार्‍या गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. या गाड्यांचं करंट बुकिंग अचानक वाढलंय. बंगळुरू आणि हैद्राबादमध्येही असंच चित्र आहे. पुणे पोलिसांनी काही वेळापुर्वीच पत्रकार परिषद घेऊन ईशान्य भारतीयांना सुरक्षा देण्याची हमी दिली. आम्हाला अपयश नाही आलंय, असा दावाही पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केलाय. राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. पोलीस बंदोबस्त वाढवला आणि शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सोशल नेटवर्किंग साईट्सवरून प्रक्षोभक व्हिडिओ पसरवणार्‍यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. पुणे पोलिसांनी आता या व्हिडिओचा तपास सुरू केला आहे. यासंदर्भात फेसबुक, ट्विटर आणि गूगलसोबतच मोबाईल कंपन्यांशीही पोलिसांनी संपर्क साधलाय. प्रक्षोभक व्हिडिओ काढून टाकण्याची पोलिसांनी या कंपन्यांकडे मागणी केली आहे. सोशल साईट्सवरून पसरवल्या जात असलेल्या प्रक्षोभक व्हिडिओंमुळे ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांत घबराट पसरली आहे. तसेच पुण्यातलं वातावरण शांत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गुवाहाटीकडे जाणार्‍या गाड्यांनाही सुरक्षा पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यात असलेल्या ईशान्य भारतातल्या मुलांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आले आहे.

पुण्यात प्रक्षोभक व्हिडिओ क्लिप्स

पुण्यात प्रक्षोभक व्हिडिओ पसरवण्याचा प्रयत्न होतं आहे. एमएमएसच्या माध्यामातून काही भडकावू व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या जातायत.या क्लिप्समुळे भावना भडकवण्यात येतायत अशी माहिती सह पोलीस आयुक्त संजीव सिंघल यांनी दिली.त्यांनी मुस्लीम संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेतली. या क्लिप्स बद्दल त्यांना माहिती देऊन इतर लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी केलं. अनेक खोटी दृृश्य एकत्र करुन, ती आसाममधल्या घटनांची क्लीप म्हणून दाखवली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या क्लिप्स पाहुनच हे हल्ले घडले असून या संदर्भात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच या हल्ल्याप्रकरणी एकुण तेरा जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे : विद्यार्थ्यांसाठी हेल्पाईन

मिझो स्टुडंट्स यूनियन

9762310520 8600955278

कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशन

9096977715 9665925312

मणिपूर स्टुडंट्स युनियन

9960343965 9890736927

सरहद हेल्पलाईन

9921693175 9890432332

मेघालय स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह

9975925094 9975155426

झोमी स्टुडंट्स फेडरेशन

9766492304 8055769573

अरूणाचल स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशन

8600088463 9762943225

नागा स्टुडंट्स यूनियन

9890097458 9158830275

'आयबीएन लोकमत'चं आवाहन

आसाममधल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरल्या जातायतIBN लोकमचं सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी कुठल्याहीअफवांवर विश्वास ठेवू नये सामाजिक सलोखा राखणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे.अफवांवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2012 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close