S M L

लातूर जिल्ह्यावर शोककळा

14 ऑगस्टविलासराव देशमुख यांच्या निधनामुळे लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. जिल्ह्यातल्या सगळ्या बाजारपेठ, शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आली. आता 2 दिवस इथल्या बाजारपेठा बंद राहणार आहेत. उद्या सकाळी 9 वाजता विलासरावांचं पाथिर्व बाभळगावला आणलं जाईल. त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येतील. आणि दुपारी 4 वाजता बाभळगावमध्येच त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विलासराव हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते तेव्हा अख्या लातूरकरांनी देवाला पाण्यात ठेवलं होतं. त्यांची प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सर्वधर्मिय लोकांनी देवाकडे प्रार्थना केली होती. 'विलासराव म्हणजे लातूर, लातूर म्हणजे विलासराव' अशी ओळखच लातूरची होती. विलासरावांच्या निधनामुळे लातूर पोरके झाले अशी भावना व्यक्त होतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 14, 2012 09:03 AM IST

लातूर जिल्ह्यावर शोककळा

14 ऑगस्ट

विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. जिल्ह्यातल्या सगळ्या बाजारपेठ, शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आली. आता 2 दिवस इथल्या बाजारपेठा बंद राहणार आहेत. उद्या सकाळी 9 वाजता विलासरावांचं पाथिर्व बाभळगावला आणलं जाईल. त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येतील. आणि दुपारी 4 वाजता बाभळगावमध्येच त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विलासराव हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते तेव्हा अख्या लातूरकरांनी देवाला पाण्यात ठेवलं होतं. त्यांची प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सर्वधर्मिय लोकांनी देवाकडे प्रार्थना केली होती. 'विलासराव म्हणजे लातूर, लातूर म्हणजे विलासराव' अशी ओळखच लातूरची होती. विलासरावांच्या निधनामुळे लातूर पोरके झाले अशी भावना व्यक्त होतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2012 09:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close