S M L

अफवा पसरवणार्‍यांवर कडक कारवाईचा पंतप्रधानांचा इशारा

17 ऑगस्टआसामधल्या हिंसाचाराचे पडसाद आज संसदेत उमटले. ईशान्य भारतीयांवरच्या हल्ल्यांबद्दल चर्चा झाली. ईशान्य भारतीय नागरिकांच्या पाठिशी उभं राहावं, असं आवाहन सगळ्या पक्षांनी केलं. ईशान्य भारतीय नागरिकांना सुरक्षा पुरवण्यात येईल तसेच अफवा पसरवणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत दिला. काल गुरुवारी देशभरातून लाखो ईशान्य भारतातील नागरिक आपल्या राज्यात परतत आहे. आजही पुण्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ईशान्य भारतात परततायत, त्यांनी जाऊ नये असं आवाहन करण्यासाठी मणिपूरहून एक आमदार पुण्यामध्ये दाखल झालेत. त्यांचं स्वत:चही शिक्षण पुण्यामध्ये झालंय. पुण्यासारखं दुसरं सुरक्षित शहर कुठलंही नाही फक्त अफवांमुळे भीती पसरतेय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरु जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलंय.'IBN लोकमत'चं आवाहनआसाममधल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरल्या जात आहे. आयबीएन लोकमतचं सर्व नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सामाजिक सलोखा राखणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अफवांवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखा.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2012 05:05 PM IST

अफवा पसरवणार्‍यांवर कडक कारवाईचा पंतप्रधानांचा इशारा

17 ऑगस्ट

आसामधल्या हिंसाचाराचे पडसाद आज संसदेत उमटले. ईशान्य भारतीयांवरच्या हल्ल्यांबद्दल चर्चा झाली. ईशान्य भारतीय नागरिकांच्या पाठिशी उभं राहावं, असं आवाहन सगळ्या पक्षांनी केलं. ईशान्य भारतीय नागरिकांना सुरक्षा पुरवण्यात येईल तसेच अफवा पसरवणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत दिला. काल गुरुवारी देशभरातून लाखो ईशान्य भारतातील नागरिक आपल्या राज्यात परतत आहे. आजही पुण्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ईशान्य भारतात परततायत, त्यांनी जाऊ नये असं आवाहन करण्यासाठी मणिपूरहून एक आमदार पुण्यामध्ये दाखल झालेत. त्यांचं स्वत:चही शिक्षण पुण्यामध्ये झालंय. पुण्यासारखं दुसरं सुरक्षित शहर कुठलंही नाही फक्त अफवांमुळे भीती पसरतेय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरु जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलंय.

'IBN लोकमत'चं आवाहन

आसाममधल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरल्या जात आहे. आयबीएन लोकमतचं सर्व नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सामाजिक सलोखा राखणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अफवांवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2012 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close