S M L

इंदू मिलसाठी पंतप्रधानांनी दिलं कार्यवाहीचं आश्वासन

18 ऑगस्टराज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदू मिलमध्ये व्हावे यासाठी आपण भावनिक दृष्ट्या जोडले गेलो असून या स्मारकाबाबतच्या तुमच्या भावनाही मी जाणून आहे. त्यामुळे हे स्मारक लवकरात लवकर व्हावं ही केंद्र सरकारचीही भूमिका आहे असं सांगत पंतप्रधानांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाला देऊ असं आश्वासन दिलं. आज पंतप्रधान मुंबई दौर्‍यावर होते. इंदू मिलच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटलं. इंदू मिलची जागा राज्य सरकारला देण्यास एनटीसीकडून टाळाटाळ होतेय. या जागेची किंमत म्हणून एनटीसीनं राज्य सरकारकडे साडेपाच हजार कोटींची मागणी केली आहे. तर राज्य सरकार मात्र 1200 कोटी रूपयांचा टीडीआर द्यायला तयार आहे. आपण याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाला देऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, एकनाथ गायकवाड , वर्षा गायकवाड ,जयंत पाटील , छगन भुजबळ ,रामदास आठवले , आनंदराज आंबेडकर , जोगेंद्र कवाडे बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधानांनी आश्वासन पूर्ण नाही केलं. तर आपण आंदोलन करू, असा इशारा आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 18, 2012 04:06 PM IST

इंदू मिलसाठी पंतप्रधानांनी दिलं कार्यवाहीचं आश्वासन

18 ऑगस्ट

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदू मिलमध्ये व्हावे यासाठी आपण भावनिक दृष्ट्या जोडले गेलो असून या स्मारकाबाबतच्या तुमच्या भावनाही मी जाणून आहे. त्यामुळे हे स्मारक लवकरात लवकर व्हावं ही केंद्र सरकारचीही भूमिका आहे असं सांगत पंतप्रधानांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाला देऊ असं आश्वासन दिलं.

आज पंतप्रधान मुंबई दौर्‍यावर होते. इंदू मिलच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटलं. इंदू मिलची जागा राज्य सरकारला देण्यास एनटीसीकडून टाळाटाळ होतेय. या जागेची किंमत म्हणून एनटीसीनं राज्य सरकारकडे साडेपाच हजार कोटींची मागणी केली आहे. तर राज्य सरकार मात्र 1200 कोटी रूपयांचा टीडीआर द्यायला तयार आहे. आपण याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाला देऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, एकनाथ गायकवाड , वर्षा गायकवाड ,जयंत पाटील , छगन भुजबळ ,रामदास आठवले , आनंदराज आंबेडकर , जोगेंद्र कवाडे बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधानांनी आश्वासन पूर्ण नाही केलं. तर आपण आंदोलन करू, असा इशारा आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2012 04:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close