S M L

मनसेच्या सभेला परवानगी, मोर्चाला नाही !

20 ऑगस्ट मनसे उद्या गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. या मोर्चाच्यानंतर आझाद मैदान इथं सभेत रुपांतर होणार आहे. तर त्या सभेला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. गिरगाव चौपाटीचा परिसर हा सायलेन्स झोन आहे. त्याप्रमाणं त्याठिकाणी मोर्चा काढण्यास आणि सभा घेण्यासही बंदी आहे. म्हणून मनसेच्या मोर्चाला परवानगी मिळाली नाही. हायकोर्टाच्या आदेशानुसार गिरगावात मोर्चा काढायला बंदी आहे. त्यानुसार इथं मोर्चा काढता येणार नाही, अशी नोटीस डी बी मार्ग पोलिसांनी मनसेला पाठवली आहे. मुंबई पोलिसांचे मनसेला पत्र मा. उच्च न्यायालयाच्या 2005 च्या आदेशानुसार गिरगाव चौपाटी येथे कोणत्याही राजकीय पक्षास सभा घेणे किंवा सामुहिक प्रयत्नांसाठी एकत्र येणे यावर बंदी घालण्यात आली आहे. डॉ. ए. पुरंदरे हा मार्ग अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या येण्या-जाण्यासाठीचा आहे. त्यामुळे तेथे लोक जमल्यामुळे त्या मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे. त्याचबरोबर या मार्गावरील विल्सन कॉलेज आणि डॉ. पुरंदरे रुग्णालय हे शांतता क्षेत्रात येतात. म्हणून आपण मागितलेली परवानगी नाकारण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2012 04:49 PM IST

मनसेच्या सभेला परवानगी, मोर्चाला नाही !

20 ऑगस्ट

मनसे उद्या गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. या मोर्चाच्यानंतर आझाद मैदान इथं सभेत रुपांतर होणार आहे. तर त्या सभेला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. गिरगाव चौपाटीचा परिसर हा सायलेन्स झोन आहे. त्याप्रमाणं त्याठिकाणी मोर्चा काढण्यास आणि सभा घेण्यासही बंदी आहे. म्हणून मनसेच्या मोर्चाला परवानगी मिळाली नाही. हायकोर्टाच्या आदेशानुसार गिरगावात मोर्चा काढायला बंदी आहे. त्यानुसार इथं मोर्चा काढता येणार नाही, अशी नोटीस डी बी मार्ग पोलिसांनी मनसेला पाठवली आहे. मुंबई पोलिसांचे मनसेला पत्र मा. उच्च न्यायालयाच्या 2005 च्या आदेशानुसार गिरगाव चौपाटी येथे कोणत्याही राजकीय पक्षास सभा घेणे किंवा सामुहिक प्रयत्नांसाठी एकत्र येणे यावर बंदी घालण्यात आली आहे. डॉ. ए. पुरंदरे हा मार्ग अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या येण्या-जाण्यासाठीचा आहे. त्यामुळे तेथे लोक जमल्यामुळे त्या मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे. त्याचबरोबर या मार्गावरील विल्सन कॉलेज आणि डॉ. पुरंदरे रुग्णालय हे शांतता क्षेत्रात येतात. म्हणून आपण मागितलेली परवानगी नाकारण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2012 04:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close