S M L

पाकला अफवा पसरवण्याचा पुरावा देणार - सुशीलकुमार शिंदे

20 ऑगस्टआसाम दंगल प्रकरणी देशभरात अफवा पसरवणार्‍या मागे पाकिस्तानचा हात असल्याची बाब उघड झाली होती. याप्रकरणी भारत पाकिस्तानला आपल्याकडे असलेले पुरावे लवकरच देईल असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय.पाकिस्तानातली काही समाजविरोधी तत्त्व सोशल मीडियाचा दुरूपयोग करून भारतात जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुशीलकुमार शिंदे यांनी रहमान मलिक यांच्याकडे केली होती. त्यानंतर भारताने पुरावे दिल्यास पाकिस्तान दोषींवर कारवाई करेल असं मलिक यांनी स्पष्ट केलं होतं. भारतात अशांतता पसरवण्यासाठी प्रक्षोभक व्हिडिओ पाकिस्तानातून लोड करण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. भारताने पुरावे दिल्यास पाकिस्तान दोषींवर कारवाई करेल असं मलिक यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, आसाम हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंटरनेटवरचा द्वेष पसरवणारा मजकूर काढण्यात येतोय. केंद्र सरकारने सोशल मीडियावरची अशीच आणखी 80 पेजस आणि अकाऊंट्स ब्लॉक केली आहे. तसेच सोलापूरमध्ये प्रक्षोभक व्हिडिओ पसरवणार्‍या तिघांना अटक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2012 10:57 AM IST

पाकला अफवा पसरवण्याचा पुरावा देणार - सुशीलकुमार शिंदे

20 ऑगस्ट

आसाम दंगल प्रकरणी देशभरात अफवा पसरवणार्‍या मागे पाकिस्तानचा हात असल्याची बाब उघड झाली होती. याप्रकरणी भारत पाकिस्तानला आपल्याकडे असलेले पुरावे लवकरच देईल असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय.पाकिस्तानातली काही समाजविरोधी तत्त्व सोशल मीडियाचा दुरूपयोग करून भारतात जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुशीलकुमार शिंदे यांनी रहमान मलिक यांच्याकडे केली होती. त्यानंतर भारताने पुरावे दिल्यास पाकिस्तान दोषींवर कारवाई करेल असं मलिक यांनी स्पष्ट केलं होतं.

भारतात अशांतता पसरवण्यासाठी प्रक्षोभक व्हिडिओ पाकिस्तानातून लोड करण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. भारताने पुरावे दिल्यास पाकिस्तान दोषींवर कारवाई करेल असं मलिक यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, आसाम हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंटरनेटवरचा द्वेष पसरवणारा मजकूर काढण्यात येतोय. केंद्र सरकारने सोशल मीडियावरची अशीच आणखी 80 पेजस आणि अकाऊंट्स ब्लॉक केली आहे. तसेच सोलापूरमध्ये प्रक्षोभक व्हिडिओ पसरवणार्‍या तिघांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2012 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close