S M L

सुरक्षारक्षक नव्हे, सुरक्षा'भक्षक' !

विलास बडे, मुंबई16 ऑगस्टमुंबईतील वड्याळ्यात घडलेल्या पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणात एका सुरक्षा रक्षकाला अटक झाली. आणि पवईच्या आयआयटी कॅम्पसमधील विद्यार्थीनीचा विनयभंग सुरक्षारक्षकानच केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी सुरक्षा रक्षकांच्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतल्या वडाळ्यात पल्लवी पुरकायस्थ हिची हत्या मीच केली, असा कबुलीजबाब तिच्याच सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने दिला आहे. काश्मिरमधल्या बारामुल्लाचा रहिवासी असलेल्या सज्जाद अहमदच्या अटकेनंतर सुरक्षा रक्षकांच्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. आता या प्रकरणात सुरक्षा एजन्सीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.फेब्रुवारी 2011 मध्ये तुळजापूरच्या मंदिरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्‍या पाच जणांकडे बोगस परवाने आणि शस्त्रं सापडले होते. परवाने जप्त केल्यानंतर हे पाचही जण जम्मू काश्मीरला पळून गेले. खासगी सुरक्षा एजन्सीजमध्ये नोकरी देताना परप्रांतीय तरुणांची पार्श्वभूमी तपासली जात नाही हे वारंवार समोर आलंय. राज्यात आज एक हजारहून जास्त खासगी सुरक्षा एजन्सीज आहेत. यात सुमारे 5 लाख सुरक्षारक्षक काम करतात. यात बहुतांश सुरक्षा रक्षक हे उत्तर भारतीय राज्यांमधल्या ग्रामीण भागातून येतात. उत्तर भारतातून तडीपार झालेल्या अनेक गुन्हेगारांनी खासगी सुरक्षा एजन्सीजमध्ये आश्रय घेतल्याच्या घटनाही समोर आल्या. एवढंच नाही तर 1995 मध्ये खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्‍या 2 दहशतवाद्यांनीही पोलिसांनी पकडलं. त्यांचा हा बेकायदेशीर कारभार अनेक घटनांमधून समोर आलाय. खासगी सुरक्षा एजन्सीजचा कारभार 'प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी रेग्यलेशन ऍक्ट' या कायद्याखाली चालतो. पण त्याच्या अंमलबजावणीच्या नावाने मात्र बोंब आहे. अनेक सुरक्षा एजन्सीजनी या कायद्याला धाब्यावर बसवल्यामुळे.. आता कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्यातली खाजगी सुरक्षा खाजगी सुरक्षा एजन्सी साधारण 1000 सुरक्षा रक्षकांची संख्या : 5 लाख सुरक्षा रक्षक उत्तर भारतीयतडीपार गुन्हेगारांचा शिरकाव

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2012 11:37 AM IST

सुरक्षारक्षक नव्हे, सुरक्षा'भक्षक' !

विलास बडे, मुंबई

16 ऑगस्ट

मुंबईतील वड्याळ्यात घडलेल्या पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणात एका सुरक्षा रक्षकाला अटक झाली. आणि पवईच्या आयआयटी कॅम्पसमधील विद्यार्थीनीचा विनयभंग सुरक्षारक्षकानच केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी सुरक्षा रक्षकांच्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईतल्या वडाळ्यात पल्लवी पुरकायस्थ हिची हत्या मीच केली, असा कबुलीजबाब तिच्याच सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने दिला आहे. काश्मिरमधल्या बारामुल्लाचा रहिवासी असलेल्या सज्जाद अहमदच्या अटकेनंतर सुरक्षा रक्षकांच्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. आता या प्रकरणात सुरक्षा एजन्सीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी 2011 मध्ये तुळजापूरच्या मंदिरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्‍या पाच जणांकडे बोगस परवाने आणि शस्त्रं सापडले होते. परवाने जप्त केल्यानंतर हे पाचही जण जम्मू काश्मीरला पळून गेले. खासगी सुरक्षा एजन्सीजमध्ये नोकरी देताना परप्रांतीय तरुणांची पार्श्वभूमी तपासली जात नाही हे वारंवार समोर आलंय. राज्यात आज एक हजारहून जास्त खासगी सुरक्षा एजन्सीज आहेत. यात सुमारे 5 लाख सुरक्षारक्षक काम करतात. यात बहुतांश सुरक्षा रक्षक हे उत्तर भारतीय राज्यांमधल्या ग्रामीण भागातून येतात. उत्तर भारतातून तडीपार झालेल्या अनेक गुन्हेगारांनी खासगी सुरक्षा एजन्सीजमध्ये आश्रय घेतल्याच्या घटनाही समोर आल्या. एवढंच नाही तर 1995 मध्ये खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्‍या 2 दहशतवाद्यांनीही पोलिसांनी पकडलं. त्यांचा हा बेकायदेशीर कारभार अनेक घटनांमधून समोर आलाय.

खासगी सुरक्षा एजन्सीजचा कारभार 'प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी रेग्यलेशन ऍक्ट' या कायद्याखाली चालतो. पण त्याच्या अंमलबजावणीच्या नावाने मात्र बोंब आहे. अनेक सुरक्षा एजन्सीजनी या कायद्याला धाब्यावर बसवल्यामुळे.. आता कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यातली खाजगी सुरक्षा खाजगी सुरक्षा एजन्सी साधारण 1000 सुरक्षा रक्षकांची संख्या : 5 लाख सुरक्षा रक्षक उत्तर भारतीयतडीपार गुन्हेगारांचा शिरकाव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2012 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close