S M L

राज ठाकरेंविरोधात आरपीआय कार्यकर्त्यांची निदर्शनं

22 ऑगस्टकाल मंगळवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीएसटी हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानावर सभा घेतली यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागेची मागणी होत असलेल्या इंदू मिलवरुन दलित नेत्यांवर टीका केली होती. मुंबईपाठोपाठ उत्तरप्रदेशमध्ये हिंसक जमावाचा मोर्चा निघाला. त्याही जमावाने तोडफोड केली धिंगाणा घातला. यात भगवान गौतम बुध्दांच्या मुर्तीची तोडफोड केली. आता कुठे गेल्या मायावती, कुठे गेले रामदास आठवले, कुठे गेले रा.सु.गवई, कुठे गेले प्रकाश आंबेडकर ? सगळे चिडीचुप.. नुसतं इंदू मिल..इंदू मिल..काय तिथे बंगला बांधायचा आहे का ? अशी टीका राज यांनी केली होती. राज यांच्या वक्तव्यामुळे आरपीआय कार्यकर्त्यांनी आज मुंबईत राज ठाकरेंविरोधात निदर्शनं केली. राज ठाकरेंनी काल आझाद मैदानवर त्यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार निदर्शनं केली. तर नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात रिपाई नेत्यांना इंदू मिलच्या निदर्शनाशिवाय काम नाही असं विधान केलं होतं. या विधानामुळे आंबेडकरी जनतेच्या भावनांचा अनादर झाल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनीही केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 22, 2012 09:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2012 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close