S M L

महाराष्ट्रधर्मासाठी एकत्र या - राज

23 ऑगस्ट11 ऑगस्टला झालेल्या सीएसटी हिंसाचाराचा निषेध करावा तितका थोडा आहे. अशा प्रसंगी आपआपसातील मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणणे गरजेचं आहे असं सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंच्या हाकेला साद देत महाराष्ट्रधर्मासाठी एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे. तसेच पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी राजीनामा दिला याचा बोध घेत आबांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी राज यांनी पुन्हा केली. राज ठाकरे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.मुंबईवर 26/11 चा हल्ला झाल्यानंतर आर.आर.पाटील यांना राजीनामा द्यावा लागला नंतर ते पुन्हा निवडून आले पण पुन्हा त्याच घटना घडत आहे. पुणे स्फोट, 11 ऑगस्टचा सीएसटी हिंसाचार झाला तेंव्हा पोलिसांना ऑर्डर देण्यासाठी टाळाटाळ करत 1,2 तास घातले. एवढ्यावेळेत पोलिसांना मारहाण झाली. महिला पोलिसांनाही त्या जमावाने लक्ष केलं. आबांना जर खाते सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. काय फायदा आहे अशा गृहमंत्र्यांचा ज्यांना एक धड निर्णय घेता येत नाही ? आणि म्हणतात ईदनंतर कारवाई करणार. मग माझ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली त्यांच्यावर दरोडेखोरीचे खटले भरले मग त्यावेळेसे का नाही पाहिले दसरा,दिवाळी ? ईदनंतर कारवाई करणार हे काही कारण आहे का ? पटनायकांची बदली योग्य आहे आता आबांनी यातून बोध घेऊन राजीनामा द्यावा आणि जे स्वत:ला 'टग्या' म्हणून घेणारे अजित पवार यांनी गृहखाते हाती घ्यावे अशी मागणी राज यांनी केली. बाबासाहेबांच्या नावावर दलित नेते पोळ्या भाजून घेतात - राजतसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 'शिका..संघटीत व्हा..संघर्ष करा' असा संदेश दिला पण हे दलित नेते विसरले आहे. मी माझ्या भाषणात जे म्हणालो त्यावर ठाम आहे. सीएसटी हिंसाचाराची घटना घडते तेव्हा कुठे असतात हे दलित नेते ? दुष्काळाचा विषयावर हे काही बोलत नाही. नुसते बाबासाहेब...बाबासाहेब यांचे नाव घेऊन रस्त्यावर उतरतात. इंदू मिलवर स्मारकासाठी पंतप्रधानांनी आश्वासन दिलंय. सरकार तिथे स्मारक तयार करणार आहे. सरकार काही थेट यांच्या हातात जमीन देणार नाही. मुळात बाबासाहेबांनी जे विचार दिले आहे हे जे काही करतायत ते तरी पटतंय का ? असा सवाल करत दलित नेत्यांना राज यांनी फटकारले. आपल्या मोर्चाबद्दल सामनामध्ये काय आले किंवा उध्दव काही म्हणाले यापेक्षा अशा गंभीर प्रश्नावर सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येऊन सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे असं सांगत उध्दव यांच्या हाकेला राज यांनी साद दिली. राज यांच्या या विधानामुळे येणार्‍या काळात शिवसेना-मनसे एकत्र येणार या चर्चेला पुरावा जरी मिळाला असला तरी उद्या एकाच मुद्यावर दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरले तर नवलं मानू नये असंच स्पष्ट होतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2012 02:04 PM IST

महाराष्ट्रधर्मासाठी एकत्र या - राज

23 ऑगस्ट

11 ऑगस्टला झालेल्या सीएसटी हिंसाचाराचा निषेध करावा तितका थोडा आहे. अशा प्रसंगी आपआपसातील मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणणे गरजेचं आहे असं सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंच्या हाकेला साद देत महाराष्ट्रधर्मासाठी एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे. तसेच पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी राजीनामा दिला याचा बोध घेत आबांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी राज यांनी पुन्हा केली. राज ठाकरे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबईवर 26/11 चा हल्ला झाल्यानंतर आर.आर.पाटील यांना राजीनामा द्यावा लागला नंतर ते पुन्हा निवडून आले पण पुन्हा त्याच घटना घडत आहे. पुणे स्फोट, 11 ऑगस्टचा सीएसटी हिंसाचार झाला तेंव्हा पोलिसांना ऑर्डर देण्यासाठी टाळाटाळ करत 1,2 तास घातले. एवढ्यावेळेत पोलिसांना मारहाण झाली. महिला पोलिसांनाही त्या जमावाने लक्ष केलं. आबांना जर खाते सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. काय फायदा आहे अशा गृहमंत्र्यांचा ज्यांना एक धड निर्णय घेता येत नाही ? आणि म्हणतात ईदनंतर कारवाई करणार. मग माझ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली त्यांच्यावर दरोडेखोरीचे खटले भरले मग त्यावेळेसे का नाही पाहिले दसरा,दिवाळी ? ईदनंतर कारवाई करणार हे काही कारण आहे का ? पटनायकांची बदली योग्य आहे आता आबांनी यातून बोध घेऊन राजीनामा द्यावा आणि जे स्वत:ला 'टग्या' म्हणून घेणारे अजित पवार यांनी गृहखाते हाती घ्यावे अशी मागणी राज यांनी केली.

बाबासाहेबांच्या नावावर दलित नेते पोळ्या भाजून घेतात - राज

तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 'शिका..संघटीत व्हा..संघर्ष करा' असा संदेश दिला पण हे दलित नेते विसरले आहे. मी माझ्या भाषणात जे म्हणालो त्यावर ठाम आहे. सीएसटी हिंसाचाराची घटना घडते तेव्हा कुठे असतात हे दलित नेते ? दुष्काळाचा विषयावर हे काही बोलत नाही. नुसते बाबासाहेब...बाबासाहेब यांचे नाव घेऊन रस्त्यावर उतरतात. इंदू मिलवर स्मारकासाठी पंतप्रधानांनी आश्वासन दिलंय. सरकार तिथे स्मारक तयार करणार आहे. सरकार काही थेट यांच्या हातात जमीन देणार नाही. मुळात बाबासाहेबांनी जे विचार दिले आहे हे जे काही करतायत ते तरी पटतंय का ? असा सवाल करत दलित नेत्यांना राज यांनी फटकारले. आपल्या मोर्चाबद्दल सामनामध्ये काय आले किंवा उध्दव काही म्हणाले यापेक्षा अशा गंभीर प्रश्नावर सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येऊन सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे असं सांगत उध्दव यांच्या हाकेला राज यांनी साद दिली. राज यांच्या या विधानामुळे येणार्‍या काळात शिवसेना-मनसे एकत्र येणार या चर्चेला पुरावा जरी मिळाला असला तरी उद्या एकाच मुद्यावर दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरले तर नवलं मानू नये असंच स्पष्ट होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2012 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close