S M L

जमिनीसाठी वयोवृध्द शेतकरी झिजवत आहे कार्यालयाचे उंबरठे

24 ऑगस्टजमिनीच्या मोबदल्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या हाडोळी गावचे वयोवृद्ध शेतकरी 20 वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशालाही प्रशासनाने केराची टोपली दाखवली. त्यामुळे या शेतकर्‍यांनी आता उपोषणाचा मार्ग निवडलाय. पाझर तलावासाठी 20 वर्षांपूर्वी या शेतकर्‍यांच्या जमिनी अत्यल्प किंमतीला सरकारने घेतल्या. त्याविरोधात शेतकरी न्यायालयात गेले. जिल्हा न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिला. पण शेतकर्‍यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हे शेतकरी हक्काच्या पैशांसाठी सरकारशी लढताहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2012 01:47 PM IST

जमिनीसाठी वयोवृध्द शेतकरी झिजवत आहे कार्यालयाचे उंबरठे

24 ऑगस्ट

जमिनीच्या मोबदल्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या हाडोळी गावचे वयोवृद्ध शेतकरी 20 वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशालाही प्रशासनाने केराची टोपली दाखवली. त्यामुळे या शेतकर्‍यांनी आता उपोषणाचा मार्ग निवडलाय. पाझर तलावासाठी 20 वर्षांपूर्वी या शेतकर्‍यांच्या जमिनी अत्यल्प किंमतीला सरकारने घेतल्या. त्याविरोधात शेतकरी न्यायालयात गेले. जिल्हा न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिला. पण शेतकर्‍यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हे शेतकरी हक्काच्या पैशांसाठी सरकारशी लढताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2012 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close