S M L

रॅलीवरुन केजरीवाल -किरण बेदी यांच्यात मतभेद

25 ऑगस्टउद्या रविवारी दिल्लीत पंतप्रधान आणि भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या घराला घेराव घालण्यावरून अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांच्यात मतभेद असल्याचं समोर आलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी रविवारी इंडिया अगेंस्ट करप्शनचे कार्यकर्ते पंतप्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या घराला घेराव घालण्याची घोषणा केली होती. पण किरण बेदी यांच्यामते जो पक्ष सत्तेत आहे त्यांच्याच नेत्यांच्या घरांना घेराव घालणं योग्य आहे. त्यामुळे या दोघांमधले मतभेद समोर आले आहे. तर दुसरीकडे या रॅलीला आपण परवानगी देऊ शकत नसल्याचं एका पत्रात दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल आणि इंडिया अगेंस्ट करप्शनला कळवलंय. कोळसा खाण घोटाळ्यामध्ये सर्व राजकीय पक्ष दोषी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याविरोधात इंडिया अगेंस्ट करप्शननं मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि ओरीसाच्या मुख्यमंत्र्यांच्या घरांबाहेरही घेराव घालण्याचं ठरवलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 25, 2012 01:36 PM IST

रॅलीवरुन केजरीवाल -किरण बेदी यांच्यात मतभेद

25 ऑगस्ट

उद्या रविवारी दिल्लीत पंतप्रधान आणि भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या घराला घेराव घालण्यावरून अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांच्यात मतभेद असल्याचं समोर आलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी रविवारी इंडिया अगेंस्ट करप्शनचे कार्यकर्ते पंतप्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या घराला घेराव घालण्याची घोषणा केली होती. पण किरण बेदी यांच्यामते जो पक्ष सत्तेत आहे त्यांच्याच नेत्यांच्या घरांना घेराव घालणं योग्य आहे. त्यामुळे या दोघांमधले मतभेद समोर आले आहे. तर दुसरीकडे या रॅलीला आपण परवानगी देऊ शकत नसल्याचं एका पत्रात दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल आणि इंडिया अगेंस्ट करप्शनला कळवलंय. कोळसा खाण घोटाळ्यामध्ये सर्व राजकीय पक्ष दोषी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याविरोधात इंडिया अगेंस्ट करप्शननं मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि ओरीसाच्या मुख्यमंत्र्यांच्या घरांबाहेरही घेराव घालण्याचं ठरवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2012 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close