S M L

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर अंत्यसंस्कार...

29 नोव्हेंबर, बंगळुरूमुंबईतल्या ताज हॉटेलवरच्या दहशतवादी हल्ल्यात एकतीस वर्षीय मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना वीरमरण आलंय. अत्यंत शूर आणि शिस्तप्रिय असणार्‍या मेजर संदीपवर बंगळुरूमध्ये, म्हणजे त्यांच्याच राहत्या शहरात अंत्यसंस्कार होतायत. इस्रोमध्ये इनसॅट प्रोग्रॅमचे संचालक असणार्‍या त्यांच्या वडिलांनी मात्र मुलाचा मृत्यू मोठ्या धैर्यानं स्वीकारलाय. मुंबईत अतिरेक्यांच्या मोहिमेवर येण्याआधी अगदी काही काळच संदीप यांनी त्यांच्या वडिलांशी फोनवरून संभाषण केलं होतं. पण दुदैर्वाची गोष्ट म्हणजे संदीप हे मुंबईतल्या कामगिरीवर जात असल्याची कल्पना त्यांच्या परिवाराला नव्हती. संदीप यांना हुतात्मा म्हणण्यापेक्षा देशासाठी कामगिरी बजावताना त्याला वीरमरण आल्याचंच समाधान जास्त असल्याचं त्यांनी म्हटलंय. सतरा मार्च 1977 रोजी संदीप उन्नीकृष्णन यांचा जन्म झाला होता. केरळहून सुमारे चाळीस वर्षांपूर्वी संदीप यांच्या परिवारानं बंगळुरूमध्ये कायमचं स्थलांतर केलं होतं. इस्रो क़ॉलनीतल्या अक्षय विहार लेआऊटमध्ये त्यांचं घर आहे,जिथं आता शोककळा पसरलीय. आता संदीप यांच्यामागं त्यांचे आई-वडिल आणि मोठी बहीण संध्या या आहेत . संदीप यांचं शालेय शिक्षण उल्सूरजवळच्या फ्रँक अँटनी पब्लिक स्कूलमध्ये झालं होतं. बारावीनंतर 1999 साली त्यांना एनडीएमधून कमिशन मिळालं होतं आणि तिथूनच मेजर संदीप यांच्या लष्करी जीवनाची सुरूवात झाली . संदीप एक उत्तम अ‍ॅथलेटही होते. सातव्या बिहार रेजिमेंटमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं. त्यानंतर गेल्याच वर्षी म्हणजे वीस जानेवारी 2007साली त्यांचा एनएसजीमध्ये समावेश करण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2008 06:27 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2008 06:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close