S M L

केरोसीन अनुदानाला नाशिकपासून सुरुवात

28 ऑगस्टरेशनवरच्या केरोसीनसाठीचं अनुदान थेट लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा नाशिकसह 6 जिल्ह्यांमध्ये सुरू झाला आहे. केरोसीन वितरणातल्या गैरव्यवहारांना आळा घालण्याच्या उद्देशाने थेट रोख रक्कमेचा परतावा देण्याचा पर्याय पुढे आला आहे. नाशिक, नंदुरबार, मुंबई, पुणे, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यांची या पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये केरोसीनसाठी पात्र रेशनकार्डधारकांची बँकखाती काढण्यात येणार आहेत. त्यासाठी बँकांसोबत चर्चा सुरू आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही खाती काढण्याची मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यांच्या पातळीवर नेमण्यात आलेल्या समित्या याच्या अमलबजावणीचे काम करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2012 11:46 AM IST

केरोसीन अनुदानाला नाशिकपासून सुरुवात

28 ऑगस्ट

रेशनवरच्या केरोसीनसाठीचं अनुदान थेट लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा नाशिकसह 6 जिल्ह्यांमध्ये सुरू झाला आहे. केरोसीन वितरणातल्या गैरव्यवहारांना आळा घालण्याच्या उद्देशाने थेट रोख रक्कमेचा परतावा देण्याचा पर्याय पुढे आला आहे. नाशिक, नंदुरबार, मुंबई, पुणे, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यांची या पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये केरोसीनसाठी पात्र रेशनकार्डधारकांची बँकखाती काढण्यात येणार आहेत. त्यासाठी बँकांसोबत चर्चा सुरू आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही खाती काढण्याची मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यांच्या पातळीवर नेमण्यात आलेल्या समित्या याच्या अमलबजावणीचे काम करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2012 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close