S M L

विजयकुमार,योगेश्वरला खेलरत्न तर युवीला अर्जुन पुरस्कार

29 ऑगस्टभारतीय क्रीडा क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणार्‍या खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांचं आज वितरण करण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवणारा नेमबाज विजय कुमार आणि ब्राँझ मेडल विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 25 खेळाडंूना अर्जुन पुरस्कार देण्यात आले. कॅन्सरच्या आजारपणातून तंदुरुस्त होऊन क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या युवराज सिंगचा यामध्ये समावेश आहे. तसेच महाराष्ट्राची धावपटू कविता राऊत आणि कुस्तीपटू नरसिंग यादव याचाही अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतीय बॉक्सिंग टीमध्ये कोच बी आय फर्नांडिस यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान केला गेला. फर्नांडिस हे क्युबाचे आहेत आणि यंदा प्रथमच परदेशी कोचला हा सन्मान मिळाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2012 01:46 PM IST

विजयकुमार,योगेश्वरला खेलरत्न तर युवीला अर्जुन पुरस्कार

29 ऑगस्ट

भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणार्‍या खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांचं आज वितरण करण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवणारा नेमबाज विजय कुमार आणि ब्राँझ मेडल विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 25 खेळाडंूना अर्जुन पुरस्कार देण्यात आले. कॅन्सरच्या आजारपणातून तंदुरुस्त होऊन क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या युवराज सिंगचा यामध्ये समावेश आहे. तसेच महाराष्ट्राची धावपटू कविता राऊत आणि कुस्तीपटू नरसिंग यादव याचाही अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतीय बॉक्सिंग टीमध्ये कोच बी आय फर्नांडिस यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान केला गेला. फर्नांडिस हे क्युबाचे आहेत आणि यंदा प्रथमच परदेशी कोचला हा सन्मान मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2012 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close