S M L

दुष्काळी यादीत तालुका समावेशासाठी शेतकरी रस्त्यावर

28 ऑगस्टराज्य सरकारच्या दुष्काळी यादीत अनेक तालुक्यांच्या समावेश न झाल्यामुळे अनेक जिल्हात शेतकर्‍यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. बार्शी तालुक्यात सत्ताधारी काँग्रेस कार्यकर्त्यांना मोर्चा काढण्याची पाळी आली. बार्शी तालुका दुष्काळग्रस्त करावा, करपलेल्या पिकंाना नुकसान भरपाई द्यावी, चारा डेपो पुन्हा सुरु करावेत अशी मागणी शेतकर्‍यांची होती. तहसील कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते. सेनगाव तालुक्याचा यादीत समावेश !हिंगोलीत सेनगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश न केल्यामुळे शेतकर्‍यामध्ये संतापाच वातावरण आहे. शिवसेनेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. आठ दिवसात तालुका दुष्काळग्रस्त न घोषित केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेनेनं दिला. या मोर्च्यात शेतकरी मोठ्यासंख्येनं सहभागी झाले होते. सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा !औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी भाजपच्या नेतृत्वात मोर्चा काढला. या मोर्चात शेतकरी आपल्या बैलबंडीसह सहभागी झाले होते. पावसाची सरासरी 31 टक्यांपर्यंत असुन देखिल सरकारने तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला. शेतकर्‍यांना कर्ज व विजबील माफ करा, चारा डेपो सुरु करा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दुष्काळ जाहीर करण्यास सरकारकडून दिरंगाई - राजू शेट्टीदरम्यान, सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने दुष्काळ जाहीर करण्यास सरकारकडून दिरंगाई होतेय अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्‌टी यांनी केली. दुष्काळाच्या मुद्यावर शरद पवार यांचा मतदारसंघ असलेल्या माढ्यात आंदोलन करणार असा इशाराही खासदार राजू शेट्टींनी दिला. चारा छावण्यांमधून होणारा भ्रष्टाचार टाळण्यासाठी थेट शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करावेत अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2012 12:31 PM IST

दुष्काळी यादीत तालुका समावेशासाठी शेतकरी रस्त्यावर

28 ऑगस्ट

राज्य सरकारच्या दुष्काळी यादीत अनेक तालुक्यांच्या समावेश न झाल्यामुळे अनेक जिल्हात शेतकर्‍यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. बार्शी तालुक्यात सत्ताधारी काँग्रेस कार्यकर्त्यांना मोर्चा काढण्याची पाळी आली. बार्शी तालुका दुष्काळग्रस्त करावा, करपलेल्या पिकंाना नुकसान भरपाई द्यावी, चारा डेपो पुन्हा सुरु करावेत अशी मागणी शेतकर्‍यांची होती. तहसील कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते.

सेनगाव तालुक्याचा यादीत समावेश !हिंगोलीत सेनगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश न केल्यामुळे शेतकर्‍यामध्ये संतापाच वातावरण आहे. शिवसेनेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. आठ दिवसात तालुका दुष्काळग्रस्त न घोषित केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेनेनं दिला. या मोर्च्यात शेतकरी मोठ्यासंख्येनं सहभागी झाले होते.

सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा !

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी भाजपच्या नेतृत्वात मोर्चा काढला. या मोर्चात शेतकरी आपल्या बैलबंडीसह सहभागी झाले होते. पावसाची सरासरी 31 टक्यांपर्यंत असुन देखिल सरकारने तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला. शेतकर्‍यांना कर्ज व विजबील माफ करा, चारा डेपो सुरु करा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दुष्काळ जाहीर करण्यास सरकारकडून दिरंगाई - राजू शेट्टी

दरम्यान, सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने दुष्काळ जाहीर करण्यास सरकारकडून दिरंगाई होतेय अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्‌टी यांनी केली. दुष्काळाच्या मुद्यावर शरद पवार यांचा मतदारसंघ असलेल्या माढ्यात आंदोलन करणार असा इशाराही खासदार राजू शेट्टींनी दिला. चारा छावण्यांमधून होणारा भ्रष्टाचार टाळण्यासाठी थेट शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करावेत अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2012 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close