S M L

जगभरातील सर्वाधिक कुष्ठरुग्ण भारतात, महाराष्ट्र दुसर्‍या नंबरवर !

अलका धुपकर, मुंबई 28 ऑगस्टमहारोग म्हणून ज्या रोगाला ओळखलं जातं, त्या कुष्ठरोगाचा धोका भारतात वाढला आहे. कारण, भारतात कुष्ठरोगाचे जगातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सुदीप बंडोपाध्याय यांनीच राज्यसभेमध्ये ही माहिती दिलीय. सर्वात धक्कादायक म्हणजे कुष्ठरोगाच्या उच्चाटनाची पातळी भारताने 2005 साली गाठली होती. आता कुष्ठरोगाच्या निर्मूलनाच्या टप्प्यावर असताना नव्या पेशंट्सच्या आकडेवारीनं या मोहिमेलाच मोठा धक्का बसलाय. भारतात कुष्ठरुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र दुसर्‍या नंबरवर आहे. अंबरनाथला राहणारा साई हा 31 वर्षाचा तरुण मुलगा...त्याच्या हाताची बोटं झडायला लागल्यावर तो डॉक्टरकडे गेला. पण कुष्ठरोग झालाय, हे कळताच त्याला घरं सोडावं लागलं.68 वर्षांच्या रामदास यांनाही गेल्यावर्षीच कुष्ठरोग झाला.त्यांचे हात पाय झडणार होते. पण त्यांच्या जखमांवर वेळीच उपचार झाले. पण सोशल स्टिगमाचा फटका त्यांनाही बसला. एक वर्ष ते वडाळ्याच्या हॉस्पिटलमध्ये आहेत.कुष्ठरोग हा कुष्ठजंतूंमुळे होणारा आजार आहे. जो पूर्ण बरा होऊ शकतो. पण कुष्ठरोग्यांकडे सामाजिक कलंक म्हणून पाहिलं जातं आणि त्यातूनच हा आजार दडवला जातो.भारतात कुष्ठरुग्णांची वाढती संख्या2009-10 : 1,26,800 कुष्ठरुग्ण2010-11 : 1,27,295 कुष्ठरुग्णराज्यात कुष्ठरुग्णांची संख्याउत्तरप्रदेश - 24,627 कुष्ठरुग्णमहाराष्ट्र - 17,892 कुष्ठरुग्णबिहार - 17,801 कुष्ठरुग्णहॅरी अक्वॅर्थ, बाबा आमटे आणि महात्मा गांधींनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचं दिलेलं व्रत हे पूर्ण झालाय, असा सार्वत्रिक गैरसमज होता. पण, महाराष्ट्रातल्या नव्या आकडेवारीनी हे दाखवून दिलंय की, हा वसा महाराष्ट्राला अर्धवट सोडता येणार नाही.कुष्ठरोग उच्चाटनापासून- निर्मूलनापर्यंतचा प्रवास आता अधिक अवघड बनलाय. महारोगाविरोधातल्या लढाईसाठी सरकारला त्याविरोधात महामोहीमच आखावी लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2012 04:25 PM IST

जगभरातील सर्वाधिक कुष्ठरुग्ण भारतात, महाराष्ट्र दुसर्‍या नंबरवर !

अलका धुपकर, मुंबई

28 ऑगस्ट

महारोग म्हणून ज्या रोगाला ओळखलं जातं, त्या कुष्ठरोगाचा धोका भारतात वाढला आहे. कारण, भारतात कुष्ठरोगाचे जगातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सुदीप बंडोपाध्याय यांनीच राज्यसभेमध्ये ही माहिती दिलीय. सर्वात धक्कादायक म्हणजे कुष्ठरोगाच्या उच्चाटनाची पातळी भारताने 2005 साली गाठली होती. आता कुष्ठरोगाच्या निर्मूलनाच्या टप्प्यावर असताना नव्या पेशंट्सच्या आकडेवारीनं या मोहिमेलाच मोठा धक्का बसलाय. भारतात कुष्ठरुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र दुसर्‍या नंबरवर आहे. अंबरनाथला राहणारा साई हा 31 वर्षाचा तरुण मुलगा...त्याच्या हाताची बोटं झडायला लागल्यावर तो डॉक्टरकडे गेला. पण कुष्ठरोग झालाय, हे कळताच त्याला घरं सोडावं लागलं.

68 वर्षांच्या रामदास यांनाही गेल्यावर्षीच कुष्ठरोग झाला.त्यांचे हात पाय झडणार होते. पण त्यांच्या जखमांवर वेळीच उपचार झाले. पण सोशल स्टिगमाचा फटका त्यांनाही बसला. एक वर्ष ते वडाळ्याच्या हॉस्पिटलमध्ये आहेत.

कुष्ठरोग हा कुष्ठजंतूंमुळे होणारा आजार आहे. जो पूर्ण बरा होऊ शकतो. पण कुष्ठरोग्यांकडे सामाजिक कलंक म्हणून पाहिलं जातं आणि त्यातूनच हा आजार दडवला जातो.

भारतात कुष्ठरुग्णांची वाढती संख्या2009-10 : 1,26,800 कुष्ठरुग्ण2010-11 : 1,27,295 कुष्ठरुग्ण

राज्यात कुष्ठरुग्णांची संख्याउत्तरप्रदेश - 24,627 कुष्ठरुग्णमहाराष्ट्र - 17,892 कुष्ठरुग्णबिहार - 17,801 कुष्ठरुग्ण

हॅरी अक्वॅर्थ, बाबा आमटे आणि महात्मा गांधींनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचं दिलेलं व्रत हे पूर्ण झालाय, असा सार्वत्रिक गैरसमज होता. पण, महाराष्ट्रातल्या नव्या आकडेवारीनी हे दाखवून दिलंय की, हा वसा महाराष्ट्राला अर्धवट सोडता येणार नाही.

कुष्ठरोग उच्चाटनापासून- निर्मूलनापर्यंतचा प्रवास आता अधिक अवघड बनलाय. महारोगाविरोधातल्या लढाईसाठी सरकारला त्याविरोधात महामोहीमच आखावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2012 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close