S M L

विलासराव देशमुख यांच्या अस्थींचे मुंबईत विसर्जन

30 ऑगस्टकाँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या अस्थींचं आज मुंबईतील बाणगंगा तलावात विसर्जन करण्यात आलंय. विलासरावांच्या अस्थींचे विसर्जन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते झालं. गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानजवळच्या राजीव गांधी भवन इथं विलासरावांचा अस्थीकलश कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंग यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व 35 जिल्ह्यातही अस्थिकलश ठेवण्यात आला होता. त्यांचं स्थानिक नदीमध्ये विसर्जन करण्यात आलं. विलासरावांच्या अस्थिविसर्जनामागे वेगळं राजकारण असल्याची चर्चा गेल्या काही दिवसात रंगली होती. विलासरावांच्या अस्थीकलश मुंबईत आणण्यात यावा असा तसेच राज्यभरात याचे दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात यावं अशी आखणी माणिकरावांनी केली होती. मात्र माणिकरावांच्या या नियोजनावर हायकमांड नाराज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2012 12:46 PM IST

विलासराव देशमुख यांच्या अस्थींचे मुंबईत विसर्जन

30 ऑगस्ट

काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या अस्थींचं आज मुंबईतील बाणगंगा तलावात विसर्जन करण्यात आलंय. विलासरावांच्या अस्थींचे विसर्जन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते झालं. गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानजवळच्या राजीव गांधी भवन इथं विलासरावांचा अस्थीकलश कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंग यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व 35 जिल्ह्यातही अस्थिकलश ठेवण्यात आला होता. त्यांचं स्थानिक नदीमध्ये विसर्जन करण्यात आलं. विलासरावांच्या अस्थिविसर्जनामागे वेगळं राजकारण असल्याची चर्चा गेल्या काही दिवसात रंगली होती. विलासरावांच्या अस्थीकलश मुंबईत आणण्यात यावा असा तसेच राज्यभरात याचे दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात यावं अशी आखणी माणिकरावांनी केली होती. मात्र माणिकरावांच्या या नियोजनावर हायकमांड नाराज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2012 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close