S M L

खाणवाटप घोटाळ्या प्रकरणी सीबीआयचे 31 ठिकाणी छापे

04 सप्टेंबरकोळसा खाणवाटप घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने देशभरात आज कारवाईला सुरूवात केली आहे. 10 शहरांमध्ये 31 ठिकाणी छापे घालण्यात आले आहे. मुंबई, नागपूर, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद या शहरांमध्ये ही कारवाई करण्यात आली. 5 खाजगी कंपन्यांविरुद्ध सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. यातील काही कंपन्या काँग्रेस तसेच भाजपच्या काही नेत्यांशी संबंधित आहेत. यामध्ये विन्नी आयर्न अँड स्टील ही झारखंडचे मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या मालकीची कंपनी आहे. नवभारत स्टील - भाजप नेत्या नीना सिंग यांचे या कंपनीचे प्रवर्तक आहेत. जेएलडी यवतमाळ, जेएएस इन्फ्रास्ट्रक्चर- काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांच्याशी संबंधित आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2012 10:44 AM IST

खाणवाटप घोटाळ्या प्रकरणी सीबीआयचे 31 ठिकाणी छापे

04 सप्टेंबर

कोळसा खाणवाटप घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने देशभरात आज कारवाईला सुरूवात केली आहे. 10 शहरांमध्ये 31 ठिकाणी छापे घालण्यात आले आहे. मुंबई, नागपूर, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद या शहरांमध्ये ही कारवाई करण्यात आली. 5 खाजगी कंपन्यांविरुद्ध सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. यातील काही कंपन्या काँग्रेस तसेच भाजपच्या काही नेत्यांशी संबंधित आहेत. यामध्ये विन्नी आयर्न अँड स्टील ही झारखंडचे मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या मालकीची कंपनी आहे. नवभारत स्टील - भाजप नेत्या नीना सिंग यांचे या कंपनीचे प्रवर्तक आहेत. जेएलडी यवतमाळ, जेएएस इन्फ्रास्ट्रक्चर- काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांच्याशी संबंधित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2012 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close