S M L

कळव्यात राष्ट्रवादीचे रेले रोको, आव्हाडांवर गुन्हा दाखल

05 सप्टेंबरठाणे इथल्या कळवा परिसरात मफतलाल कंपनीच्या जागेवरील झोपड्या तोडण्याच्या आदेशानंतर आज सकाळी राष्ट्रवादीने कळवा स्टेशनजवळ रेलरोको आंदोलन केले या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांवर दंगा माजवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हा रेले रोको करण्यात आला होता. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ऐन सकाळी झालेल्या या आंदोलनामुळे चाकरमान्यांना फटका बसला. काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना पिटळून लावले. रेल्वे आता पुर्वपदावर आली असून पण राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा नाहक फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागला. दरम्यान, शिवसेना पदाधिकारी आणि नेते याच मुद्दयांवरुन जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीला जाताहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2012 11:31 AM IST

कळव्यात राष्ट्रवादीचे रेले रोको, आव्हाडांवर गुन्हा दाखल

05 सप्टेंबर

ठाणे इथल्या कळवा परिसरात मफतलाल कंपनीच्या जागेवरील झोपड्या तोडण्याच्या आदेशानंतर आज सकाळी राष्ट्रवादीने कळवा स्टेशनजवळ रेलरोको आंदोलन केले या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांवर दंगा माजवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हा रेले रोको करण्यात आला होता. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ऐन सकाळी झालेल्या या आंदोलनामुळे चाकरमान्यांना फटका बसला. काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना पिटळून लावले. रेल्वे आता पुर्वपदावर आली असून पण राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा नाहक फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागला. दरम्यान, शिवसेना पदाधिकारी आणि नेते याच मुद्दयांवरुन जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीला जाताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2012 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close