S M L

टोलचा झोल, जयदत्त क्षीरसागर गोत्यात

आशिष जाधव, मुंबई04 सप्टेंबरटोल वसुलीच्या कंत्राटाच्या वादावरून एमएसआरडीसीचे मंत्री जयदत्त क्षीरसागर चांगलेच अडचणीत आले आहेत. सोलापूरमधील टोल वसुलीच्या कंत्राट वाटपातील अनियमिततेला जयदत्त क्षीरसागर यांना मुंबई हायकोर्टाने जबाबदार धरलं आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. "जयदत्त क्षीरसागरांच्या पाय धरले, माझे काम करा, बिलं काढून द्या म्हणून रडलो" ही कैफियत आहे, एमएसआरडीसीचे रस्ते कंत्राटदार राकेश चव्हाण यांची. आपली बिलं एमएसआरडीसीचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अडवून ठेवल्याचा आरोप करत राकेश चव्हाण यांनी एमएसआरडीसीच्या कार्यालयासमोर सोमवारी धरणं आंदोलन केलं. पण एमएसआरडीसी आणि मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या विरोधात एकटे राकेश चव्हाणांचे नाही तर अनेक जण कोर्टात गेलेत. अलिकडेच, मुंबई हायकोर्टाने क्षीरसागरांना फटकारलं. सोलापूरमधील टोल वसुलीचे कंत्राट मनमानी पद्धतीनं क्षीरसागरांनी मर्जीतल्या कंपनीला बहाल केल्याचा ठपका ठेवला. तसेच संबंधित कंत्राट रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. पण हायकोर्टाच्या या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हाण देण्याचा निर्णय जयदत्त क्षीरसागरांनी घेतलाय. दुसरीकडे, एमएसआरडीसीच्या अनागोंदी कारभारावरून भाजपनं जयदत्त क्षीरसागरांच्या राजीनाम्याची मागणी केली. एकूणच, एमएसआरडीसीमधले घोळ जयदत्त क्षीरसागरांच्या अंगलट येतील, असंच दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2012 01:17 PM IST

टोलचा झोल, जयदत्त क्षीरसागर गोत्यात

आशिष जाधव, मुंबई

04 सप्टेंबर

टोल वसुलीच्या कंत्राटाच्या वादावरून एमएसआरडीसीचे मंत्री जयदत्त क्षीरसागर चांगलेच अडचणीत आले आहेत. सोलापूरमधील टोल वसुलीच्या कंत्राट वाटपातील अनियमिततेला जयदत्त क्षीरसागर यांना मुंबई हायकोर्टाने जबाबदार धरलं आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

"जयदत्त क्षीरसागरांच्या पाय धरले, माझे काम करा, बिलं काढून द्या म्हणून रडलो" ही कैफियत आहे, एमएसआरडीसीचे रस्ते कंत्राटदार राकेश चव्हाण यांची. आपली बिलं एमएसआरडीसीचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अडवून ठेवल्याचा आरोप करत राकेश चव्हाण यांनी एमएसआरडीसीच्या कार्यालयासमोर सोमवारी धरणं आंदोलन केलं. पण एमएसआरडीसी आणि मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या विरोधात एकटे राकेश चव्हाणांचे नाही तर अनेक जण कोर्टात गेलेत.

अलिकडेच, मुंबई हायकोर्टाने क्षीरसागरांना फटकारलं. सोलापूरमधील टोल वसुलीचे कंत्राट मनमानी पद्धतीनं क्षीरसागरांनी मर्जीतल्या कंपनीला बहाल केल्याचा ठपका ठेवला. तसेच संबंधित कंत्राट रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. पण हायकोर्टाच्या या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हाण देण्याचा निर्णय जयदत्त क्षीरसागरांनी घेतलाय.

दुसरीकडे, एमएसआरडीसीच्या अनागोंदी कारभारावरून भाजपनं जयदत्त क्षीरसागरांच्या राजीनाम्याची मागणी केली. एकूणच, एमएसआरडीसीमधले घोळ जयदत्त क्षीरसागरांच्या अंगलट येतील, असंच दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2012 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close