S M L

मला कुणीही राजीनामा द्यायला सांगितलं नाही - दर्डा

05 सप्टेंबरमला कुणीही राजीनामा द्याला सांगितले नाही, राजीनाम्याची बातमी खोटी आहे असं स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आयबीएन लोकमतकडे केलं आहे. कोळसा खाणवाटप प्रकरणी काल मंगळवारी सीबीआयने 10 शहरांमध्ये 31 ठिकाणे छापे टाकले. मुंबई,दिल्ली,कोलकाता,नागपूर, हैदराबाद येथे छापे टाकण्यात आले यानंतर सीबीआयने खाणमालकांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेस खासदार विजय दर्डा, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, देवेंद्र दर्डा यांची या एफआयआरमध्ये नावं आहेत. शिवाय मनोज जैस्वाल, आनंद जैस्वाल, अभिषेक जैस्वाल, अरविंद कुमार जैस्वाल, रमेश जैस्वाल यांचीही नावं एफआयआरमध्ये आहेत. या कारवाईनंतर आज दुपारी राजेंद्र दर्डा यांना राजीनामा देण्याचे हायकमांडने आदेश दिल्याची बातमी प्रसिध्द झाली. मात्र या बातमीचे खंडन करत राजीनाम्याची मागणी केलीच नाही असं स्पष्टीकरण राजेंद्र दर्डा यांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2012 11:53 AM IST

मला कुणीही राजीनामा द्यायला सांगितलं नाही - दर्डा

05 सप्टेंबर

मला कुणीही राजीनामा द्याला सांगितले नाही, राजीनाम्याची बातमी खोटी आहे असं स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आयबीएन लोकमतकडे केलं आहे. कोळसा खाणवाटप प्रकरणी काल मंगळवारी सीबीआयने 10 शहरांमध्ये 31 ठिकाणे छापे टाकले. मुंबई,दिल्ली,कोलकाता,नागपूर, हैदराबाद येथे छापे टाकण्यात आले यानंतर सीबीआयने खाणमालकांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेस खासदार विजय दर्डा, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, देवेंद्र दर्डा यांची या एफआयआरमध्ये नावं आहेत. शिवाय मनोज जैस्वाल, आनंद जैस्वाल, अभिषेक जैस्वाल, अरविंद कुमार जैस्वाल, रमेश जैस्वाल यांचीही नावं एफआयआरमध्ये आहेत. या कारवाईनंतर आज दुपारी राजेंद्र दर्डा यांना राजीनामा देण्याचे हायकमांडने आदेश दिल्याची बातमी प्रसिध्द झाली. मात्र या बातमीचे खंडन करत राजीनाम्याची मागणी केलीच नाही असं स्पष्टीकरण राजेंद्र दर्डा यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2012 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close