S M L

तामिळनाडूत फटाका फॅक्टरीत अग्नितांडव, 52 ठार

05 सप्टेंबरतामिळनाडूतल्या शिवकाशीमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 52 लोकांचा जळून मृत्यू झाला आहे. याठिकाणी बचावकार्य सुरू आहे पण अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तामिळनाडूतल्या ओम क्रॅकर फॅक्टरीत ही आग लागली. आग लागली तेव्हा कारखान्यात 300 कर्मचारी अडकले होते. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या आग विझवण्याचं काम करत होत्या. सध्या ही आग आटोक्यात आली आहे. दिवाळी जवळ आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फट्याक्यांची निर्मिती केली जात होती.ही आग इतकी भीषण होती की या धुराचे लोळ दीड किलोमिटरच्या अंतरावरुन स्पष्ट दिसत होते. या दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या वारसांना तामिळनाडू सरकारने दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमींना 25 हजारांची आणि जखमींना 10 हजार रुपयांची मदत दिली आहे. शिवकाशी हे देशातील सर्वात मोठे फटाका तयार करणारे ठिकाण आहे. येथून देशभरात फटाके सप्लाय केली जातात.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2012 04:05 PM IST

तामिळनाडूत फटाका फॅक्टरीत अग्नितांडव, 52 ठार

05 सप्टेंबर

तामिळनाडूतल्या शिवकाशीमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 52 लोकांचा जळून मृत्यू झाला आहे. याठिकाणी बचावकार्य सुरू आहे पण अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तामिळनाडूतल्या ओम क्रॅकर फॅक्टरीत ही आग लागली. आग लागली तेव्हा कारखान्यात 300 कर्मचारी अडकले होते. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या आग विझवण्याचं काम करत होत्या. सध्या ही आग आटोक्यात आली आहे. दिवाळी जवळ आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फट्याक्यांची निर्मिती केली जात होती.ही आग इतकी भीषण होती की या धुराचे लोळ दीड किलोमिटरच्या अंतरावरुन स्पष्ट दिसत होते. या दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या वारसांना तामिळनाडू सरकारने दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमींना 25 हजारांची आणि जखमींना 10 हजार रुपयांची मदत दिली आहे. शिवकाशी हे देशातील सर्वात मोठे फटाका तयार करणारे ठिकाण आहे. येथून देशभरात फटाके सप्लाय केली जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2012 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close