S M L

'राज ठाकरेंवर तात्काळ कारवाई करा'

07 सप्टेंबरप्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. माणिकराव ठाकरे यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांना कारवाईबाबत एक पत्र पाठवलं आहे. तसेच राज ठाकरेंनी बिहारींविरोधात केलेल्या भाषणाची तात्काळ तपासणी करण्याची मागणी ठाकरेंनी केली. तसेच या पत्राची एक प्रत माणिकरावांनी मुख्यमंत्र्यांनाही पाठवली आहे. 11 ऑगस्टवर हिंसाचार प्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन दंगेखोरांना अटक केली होती. मात्र पोलिसांच्या कारवाईवर बिहारच्या सचिवांनी आक्षेप घेतल्याची खोटी बातमी एका वृत्तपत्रात छापून आली होती. याचा पुरावा घेऊन राज यांनी बिहारी लोकांना घुसखोर ठरवून मुंबईतून हाकलून लावू असा इशारा दिला होता. राज यांच्या या विधानामुळे बिहारी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकच हल्लाबोल केला होता. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी तर ठाकरे घराणे बिहारचे आहे असा तर्कट केला होता. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता राज ठाकरे यावर काय भूमिका घेता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2012 12:50 PM IST

'राज ठाकरेंवर तात्काळ कारवाई करा'

07 सप्टेंबर

प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. माणिकराव ठाकरे यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांना कारवाईबाबत एक पत्र पाठवलं आहे. तसेच राज ठाकरेंनी बिहारींविरोधात केलेल्या भाषणाची तात्काळ तपासणी करण्याची मागणी ठाकरेंनी केली. तसेच या पत्राची एक प्रत माणिकरावांनी मुख्यमंत्र्यांनाही पाठवली आहे. 11 ऑगस्टवर हिंसाचार प्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन दंगेखोरांना अटक केली होती. मात्र पोलिसांच्या कारवाईवर बिहारच्या सचिवांनी आक्षेप घेतल्याची खोटी बातमी एका वृत्तपत्रात छापून आली होती. याचा पुरावा घेऊन राज यांनी बिहारी लोकांना घुसखोर ठरवून मुंबईतून हाकलून लावू असा इशारा दिला होता. राज यांच्या या विधानामुळे बिहारी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकच हल्लाबोल केला होता. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी तर ठाकरे घराणे बिहारचे आहे असा तर्कट केला होता. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता राज ठाकरे यावर काय भूमिका घेता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2012 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close