S M L

त्रिवेदींच्या अटकेबाबत सरकारचे एक पाऊल मागे

10 सप्टेंबरवादग्रस्त व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींना पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर सर्वत्र त्याचे तीव्र पडसाद उमटले. यानंतर सरकारने आता एक पाऊल मागे घेत असीम त्रिवेदी यांची सुटका करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी नाशिकमध्ये माहिती दिली. त्रिवेदी यांची चौकशी पूर्ण झाली असल्याने त्यांना 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज नसल्यानं त्यांची लवकर सुटका करण्यासाठी त्रिवेदींना कोर्टापुढे हजर करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहे. सरकारने एक पाऊल मागे घेतलं असलं तरी त्रिवेदींवर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसांवर कारवाई होणार का असा प्रश्न आता विचारला जातोय. तर दुसरीकडे त्रिवेदी यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज वांद्रे पोलीस स्टेशनबाहेर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. त्रिवेदी यांना पोलिसांनी आकसापोटी आणि राजकीय दबावाखाली अटक केली आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांनी केला. दरम्यान देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलीसच अडचणीत आलेत. त्रिवेदी जामिनासाठी अर्ज करु शकतात असं पोलिसांनी सांगितल्यानंतर देशद्रोहाचा गुन्हा मागे घेतल्याशिवाय जामिनासाठी अर्ज करणार नाही, अशी भूमिका असीम त्रिवेदी यांनी घेतली. तसेच देशद्रोहाचा कायद्याबाबत ठोस निर्णयघेण्याची मागणीही त्रिवेदींनी केली. त्रिवेदींच्या या भूमिकेमुळेच पोलीसच आता कोंडीत सापडले आहेत. भारतीय दंडविधानाचं कलम 124.. म्हणजेच देशद्रोह कधी लावण्यात येतो ?कुणीही लिखाणातून किंवा भाषणातून किंवा चिन्हांनी सरकारविरोधात द्वेष, अपमान किंवा तिरस्कार निर्माण केला किंवा तसं करण्याचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2012 09:17 AM IST

त्रिवेदींच्या अटकेबाबत सरकारचे एक पाऊल मागे

10 सप्टेंबर

वादग्रस्त व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींना पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर सर्वत्र त्याचे तीव्र पडसाद उमटले. यानंतर सरकारने आता एक पाऊल मागे घेत असीम त्रिवेदी यांची सुटका करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी नाशिकमध्ये माहिती दिली. त्रिवेदी यांची चौकशी पूर्ण झाली असल्याने त्यांना 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज नसल्यानं त्यांची लवकर सुटका करण्यासाठी त्रिवेदींना कोर्टापुढे हजर करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहे. सरकारने एक पाऊल मागे घेतलं असलं तरी त्रिवेदींवर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसांवर कारवाई होणार का असा प्रश्न आता विचारला जातोय.

तर दुसरीकडे त्रिवेदी यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज वांद्रे पोलीस स्टेशनबाहेर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. त्रिवेदी यांना पोलिसांनी आकसापोटी आणि राजकीय दबावाखाली अटक केली आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांनी केला. दरम्यान देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलीसच अडचणीत आलेत. त्रिवेदी जामिनासाठी अर्ज करु शकतात असं पोलिसांनी सांगितल्यानंतर देशद्रोहाचा गुन्हा मागे घेतल्याशिवाय जामिनासाठी अर्ज करणार नाही, अशी भूमिका असीम त्रिवेदी यांनी घेतली. तसेच देशद्रोहाचा कायद्याबाबत ठोस निर्णयघेण्याची मागणीही त्रिवेदींनी केली. त्रिवेदींच्या या भूमिकेमुळेच पोलीसच आता कोंडीत सापडले आहेत. भारतीय दंडविधानाचं कलम 124.. म्हणजेच देशद्रोह कधी लावण्यात येतो ?

कुणीही लिखाणातून किंवा भाषणातून किंवा चिन्हांनी सरकारविरोधात द्वेष, अपमान किंवा तिरस्कार निर्माण केला किंवा तसं करण्याचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2012 09:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close