S M L

गोव्यात सर्व 90 खाणींवर बंदी

10 सप्टेंबरगोव्यातल्या सर्व खाणी बंद ठेवण्याचे आदेश गोवा सरकारने दिले आहे. या खाणींच्या कामांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय मनोहर पर्रीकर सरकारने घेतला. त्यामुळे हा फेरआढावा पूर्ण होईपर्यंत गोव्यातल्या 90 खाणी बंद राहणार आहेत. शाह आयोगाच्या अहवालानंतर सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने बेकायदेशीर खाणींना रोखलं नसल्याचा ठपका शाह आयोगाने ठेवला होता. बेकायदेशीर खाणींचा हा घोटाळा 35 हजार कोटींचा असल्याचं आयोगानं म्हटलं होतं. आणि अभयारण्यातल्या खाणी बंद कराव्यात अशी शिफारस केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2012 05:24 PM IST

गोव्यात सर्व 90 खाणींवर बंदी

10 सप्टेंबर

गोव्यातल्या सर्व खाणी बंद ठेवण्याचे आदेश गोवा सरकारने दिले आहे. या खाणींच्या कामांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय मनोहर पर्रीकर सरकारने घेतला. त्यामुळे हा फेरआढावा पूर्ण होईपर्यंत गोव्यातल्या 90 खाणी बंद राहणार आहेत. शाह आयोगाच्या अहवालानंतर सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने बेकायदेशीर खाणींना रोखलं नसल्याचा ठपका शाह आयोगाने ठेवला होता. बेकायदेशीर खाणींचा हा घोटाळा 35 हजार कोटींचा असल्याचं आयोगानं म्हटलं होतं. आणि अभयारण्यातल्या खाणी बंद कराव्यात अशी शिफारस केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2012 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close