S M L

असीम जामीन स्वीकारण्यास तयार, बुधवारी सुटका

11 सप्टेंबरव्यंगचित्रकार असीम त्रिवेदीनं अखेर जामीन स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता असीमच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालाय. उद्या दुपारी एक वाजेपर्यंत तो जामिनावर बाहेर येऊ शकेल. आज कोर्टाने 5 हजार रुपयांच्या वैयक्तिक बाँडवर हायकोर्टाने जामीन मंजूर केला. पण असीमनं सशर्त जामीन घ्यायला नकार दिला होता. वादग्रस्त व्यंगचित्र काढल्यामुळे असीमला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. जोपर्यंत देशद्रोहाचा आरोप मागे घेतला जात नाही, तोपर्यंत जामिनासाठी अपील करणार नसल्याचं असीम म्हटलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2012 03:43 PM IST

असीम जामीन स्वीकारण्यास तयार, बुधवारी सुटका

11 सप्टेंबर

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदीनं अखेर जामीन स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता असीमच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालाय. उद्या दुपारी एक वाजेपर्यंत तो जामिनावर बाहेर येऊ शकेल. आज कोर्टाने 5 हजार रुपयांच्या वैयक्तिक बाँडवर हायकोर्टाने जामीन मंजूर केला. पण असीमनं सशर्त जामीन घ्यायला नकार दिला होता. वादग्रस्त व्यंगचित्र काढल्यामुळे असीमला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. जोपर्यंत देशद्रोहाचा आरोप मागे घेतला जात नाही, तोपर्यंत जामिनासाठी अपील करणार नसल्याचं असीम म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2012 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close