S M L

बाप्पा पावला, महाराष्ट्रात 9 सिलेंडर मिळणार

19 सप्टेंबरमहागाईने होरपळेल्या जनतेनं आपली सर्व दुख बाजूला सारुन लाडक्या बाप्पाचं उत्साहात स्वागत करत आहे. डिझेल दरवाढ,सिलेंडरवर मर्यादा यांचे झळ आजच्या दिवशी बाजूला सारून बाप्पाचं स्वागत होतं आहे. पण विघ्नहर्ता गणेशानं आपल्या भक्ताच्या दुखावर फुंकर घातली आहे. आता काँग्रेसची सत्ता ज्या ज्या राज्यात आहे त्या राज्यात 6 ऐवजी 9 सिलेंडर सबसिडी दरात मिळणार आहे. याबाबत काँग्रेस पक्षाने तसे आदेश काँग्रेस मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. केंद्राने मागील आठवड्यात डिझेलच्या दरात 5 रुपये आणि घरगुती गॅस सिलेंडरवर 6 सिलेंडरची मर्यादा घातली होती. 7 वे सिलेंडर घेतले तर बाजार भावाप्रमाणे 700 ते 800 रुपये मोजावे लागणार होते. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी एकच हल्लाबोल चढवला. काल मंगळवारी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी तर आपला पाठिंबा काढून घेतला आहे. काही असो लाडक्या बाप्पाचे आगमनामुळे भक्तांना पावला असंच म्हणावं लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2012 10:21 AM IST

बाप्पा पावला, महाराष्ट्रात 9 सिलेंडर मिळणार

19 सप्टेंबर

महागाईने होरपळेल्या जनतेनं आपली सर्व दुख बाजूला सारुन लाडक्या बाप्पाचं उत्साहात स्वागत करत आहे. डिझेल दरवाढ,सिलेंडरवर मर्यादा यांचे झळ आजच्या दिवशी बाजूला सारून बाप्पाचं स्वागत होतं आहे. पण विघ्नहर्ता गणेशानं आपल्या भक्ताच्या दुखावर फुंकर घातली आहे. आता काँग्रेसची सत्ता ज्या ज्या राज्यात आहे त्या राज्यात 6 ऐवजी 9 सिलेंडर सबसिडी दरात मिळणार आहे. याबाबत काँग्रेस पक्षाने तसे आदेश काँग्रेस मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. केंद्राने मागील आठवड्यात डिझेलच्या दरात 5 रुपये आणि घरगुती गॅस सिलेंडरवर 6 सिलेंडरची मर्यादा घातली होती. 7 वे सिलेंडर घेतले तर बाजार भावाप्रमाणे 700 ते 800 रुपये मोजावे लागणार होते. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी एकच हल्लाबोल चढवला. काल मंगळवारी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी तर आपला पाठिंबा काढून घेतला आहे. काही असो लाडक्या बाप्पाचे आगमनामुळे भक्तांना पावला असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2012 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close