S M L

बाप्पाचं जल्लोषात स्वागत

19 सप्टेंबरगणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया..चा जयघोष करत राज्यभरात गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. ढोल ताशांच्या गजरात, लेझीम पथक, डिजेच्या दणदणाटात अनेक मंडळांनी आपल्या बाप्पाचं स्वागत करत आहे. घरोघरी बाप्पाचं आगमन होतं आहे. भल्या पहाटेपासूनचं विविध मूर्ती शाळामधून लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती. साग्रसंगीत, विधीवत गणेशमूर्ती नेण्याची भाविकांमध्ये जणू चढाओढच निर्माण झाली. अजूनही बाप्पाच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी पाहायाला मिळत आहे. कोकणात चाकरमान्यांनी आपला घरी वाजत गाजत गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळक यांनी पुण्यात रोवली. या पुण्यातला गणेशोत्सव हा विशेष असतो. पुण्यातील मानाच्या गणपतींचं मिरवणूक आणि प्रतिष्ठापना ही पुणेकरांसाठी महत्वाची असते. मानाच्या कसबा पेठेतल्या बाप्पाची प्रतिष्ठापना झाली. यावेळी वाजत गाजत पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली.पुण्यात मानाच्या गणपतींचे मोठ्या भक्तीभावाने स्वागतमहाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुण्यात आज गणरायाचं मोठ्या दिमखात आगमन झालं. पुण्यातील मानाच्या गणपतींची मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना झाली. मानाचा पहिला गणपती आणि पुण्याचं ग्रामदैवत असणार्‍या कसबा गणपतीची पारंपारिक पद्धतीने मिरवणुक काढण्यात आली. ढोल, लेझिम पथकाच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.तर मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी. पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना आज दुपारी झाली. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांच आगमन झालं. कार्यकर्त्यांच्या मोरया मोरयाच्या गजरात बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाचा चौथा गणपती म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुळशीबाग गणपतीची साग्रसंगीत पुजा करुन प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच पुण्यातील मानाचा 5 वा गणपती म्हणजे केसरी वाड्याचा गणपती.आज या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. लोकमान्य टिळकांचे वारस रोहीत टिळक आणि त्यांच्या कुटुंबींयानी मोठ्या उत्साहाने विधीवत गणेशाची प्रतिष्ठापना केली. सकाळी पारंपरिक पद्दतीने पालखीतून गणेशाची मूर्ती टिळक वाड्यात आणण्यात आली. मानाच्या 5 गणपतींपैकी या गणपतीचं पुणेकरांना विशेष महत्व आहे. टिळकांनी गणेशत्सोवाला खर्‍या अर्थाने सुरवात केली होती.मुंबईतील श्रीमंत जीएसबी गणेशाची प्रतिष्ठापनातर मुंबईतला सर्वात देखणा आणि श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी गणपतीची ओळख आहे.आज या गणपतीची प्रतिष्ठापनाही मोठ्या उत्साहात करण्यात आली.या गणपतीच्या दागिन्यांसोबतच या मूर्तीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे ही मूर्ती पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे. ही पूर्ण मूर्ती शाडूची बनलेली असते आणि त्यामुळेच तिच्या सुरक्षेसाठी विशेष काळजीही घेतली जाते. गणेशमूर्तीसमोर दररोज होणार्‍या वेगवेगळया पूजा यांमुळेही हा गणपती खूप प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा अशी त्याची ख्याती आहे .या गणपतीवर चढवले जाणारे दागिने अगदी नेत्रदिपक असतात. हा गणेशोत्सोव 5 दिवसांचा असतो. यावर्षीचं वैशिष्ठ्य म्हणजे या गणेशमूर्तीवर 70 किलो सोन्याचे दागिने आणि 470 किलो चांदीचे दागिने सजवण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमत 21 कोटी 50 लाख रूपये आहे. 5 दिवसांच्या या गणेशोत्सवात हजारो गणेशभक्त या गणेशाचं दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात. सुरक्षेसाठी gsb मंडळाने मंडपात 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत . तसेच 450 सिक्युरीटी गार्डस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. लालबागच्या राजाच्या दर्शनाला रिघतर दुसरीकडे राजांचा राजा लालबागचा राजा...नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असेलेला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशी पहाटेपासूनच भक्तांची रिघ लागली आहे. या मंडळाचं 79 वं वर्ष आहे. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठीच्या तीन रांगा, आणि नवसाची एक रांग आहे.कोल्हापुरात पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाचं स्वागतकोल्हापुरमध्ये पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाचं स्वागत करण्यात आलं. सकाळी 7 पासूनचं नागरिकांनी आपापल्या घरचे गणपती आणण्यास सुरुवात केल्याचं चित्र शहरात पहायला मिळालं. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कालपासूनच गणपती बाप्पाला जंगी मिरवणुकीद्वारे नेण्यास सुरुवात केली. गणपती बाप्पाच्या या स्वागतामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. अनेक मंडळांनी डॉल्बीला फाटा देत लेझिम पथकं, बँड पथकं यांना पसंती दिली. या वाद्यांच्या आवाजांनी शहरातले सर्वच रस्ते गजबजून गेले होते. गणपती बाप्पाच्या स्वागतावेळी अनेक मंडळांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकंही करुन दाखवली. तर काही मंडळांनी आकर्षक फलकांद्वारे सामाजिक संदेश दिले. त्यात लेक वाचवा अभियानाला अनेकर मंडळांनी पसंती दिली.नाशकात उत्साह शिगेलाअत्यंत मोहक अशा गणपतीच्या मूर्ती , फळं पत्री , सजावटीचं साहित्य आणि ढोलताशांचा गजर यानं नाशिकचे रस्ते फुलुन गेले आहे. एकाचवेळेस घरगुती गणपती नेण्यासाठी आलेली कुटुंब आणि सार्वजनिक गणपती नेण्यासाठी आलेले मंडळाचे कार्यकर्ते यांची गर्दी झाली होती.कोकणात बाप्पा मोरया रेकोकणात गणेशोत्सवाचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या महानगरात वसलेले चाकरमानी काल संध्याकळीच कोकणात दाखल झालेत आणि आज सकाळपासूनच आपल्या लाडक्या गणेशाला घरी नेण्यासाठी एकच गर्दी झाली आहे. मुंबईइतक्या मोठ्या अवाढव्य आकाराच्या नसल्या तरी तितक्याच आकर्षक आणि विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. मुंबईसारख्या अनेक महानगरात आता आदल्या दिवशीच मूर्ती आणण्याचा ट्रेंड आलाय पण अजूनही कोकणात मात्र अजूनही आजच्या दिवशीच मूर्ती आणण्याचा प्रघात अनेक ठिकाणी आहे. कुडाळमध्येही हिरव्यागार रस्त्यांमधून ही मूर्ती घेऊन घरी जाणारे अनेकजण पहायला मिळतात. सकाळी लवकर उठून मूर्तीशाळेतून मूर्ती आणण्याची लगबग अशी कोकणात सर्वत्रच पहायला मिळते.औरंगाबादमध्ये गणेशोत्सव उत्साहातऔरंगाबादमध्ये गणेशभक्तांचा उत्साह सकाळपासूनच दिसत आहे. आपल्या आवडत्या बाप्पाला घर घेऊन जाण्यासाठी गणेशभक्तांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर गर्दी केलीय. गणेशाच्या मुर्तीच्या दुकानाबरोबर पुजेच्या साहित्याची दुकानंातही गणेशभक्त गर्दी करताना दिसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2012 11:41 AM IST

बाप्पाचं जल्लोषात स्वागत

19 सप्टेंबर

गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया..चा जयघोष करत राज्यभरात गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. ढोल ताशांच्या गजरात, लेझीम पथक, डिजेच्या दणदणाटात अनेक मंडळांनी आपल्या बाप्पाचं स्वागत करत आहे. घरोघरी बाप्पाचं आगमन होतं आहे. भल्या पहाटेपासूनचं विविध मूर्ती शाळामधून लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती. साग्रसंगीत, विधीवत गणेशमूर्ती नेण्याची भाविकांमध्ये जणू चढाओढच निर्माण झाली. अजूनही बाप्पाच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी पाहायाला मिळत आहे. कोकणात चाकरमान्यांनी आपला घरी वाजत गाजत गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळक यांनी पुण्यात रोवली. या पुण्यातला गणेशोत्सव हा विशेष असतो. पुण्यातील मानाच्या गणपतींचं मिरवणूक आणि प्रतिष्ठापना ही पुणेकरांसाठी महत्वाची असते. मानाच्या कसबा पेठेतल्या बाप्पाची प्रतिष्ठापना झाली. यावेळी वाजत गाजत पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली.

पुण्यात मानाच्या गणपतींचे मोठ्या भक्तीभावाने स्वागत

महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुण्यात आज गणरायाचं मोठ्या दिमखात आगमन झालं. पुण्यातील मानाच्या गणपतींची मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना झाली. मानाचा पहिला गणपती आणि पुण्याचं ग्रामदैवत असणार्‍या कसबा गणपतीची पारंपारिक पद्धतीने मिरवणुक काढण्यात आली. ढोल, लेझिम पथकाच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

तर मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी. पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना आज दुपारी झाली. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांच आगमन झालं. कार्यकर्त्यांच्या मोरया मोरयाच्या गजरात बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाचा चौथा गणपती म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुळशीबाग गणपतीची साग्रसंगीत पुजा करुन प्रतिष्ठापना करण्यात आली.

तसेच पुण्यातील मानाचा 5 वा गणपती म्हणजे केसरी वाड्याचा गणपती.आज या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. लोकमान्य टिळकांचे वारस रोहीत टिळक आणि त्यांच्या कुटुंबींयानी मोठ्या उत्साहाने विधीवत गणेशाची प्रतिष्ठापना केली. सकाळी पारंपरिक पद्दतीने पालखीतून गणेशाची मूर्ती टिळक वाड्यात आणण्यात आली. मानाच्या 5 गणपतींपैकी या गणपतीचं पुणेकरांना विशेष महत्व आहे. टिळकांनी गणेशत्सोवाला खर्‍या अर्थाने सुरवात केली होती.

मुंबईतील श्रीमंत जीएसबी गणेशाची प्रतिष्ठापना

तर मुंबईतला सर्वात देखणा आणि श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी गणपतीची ओळख आहे.आज या गणपतीची प्रतिष्ठापनाही मोठ्या उत्साहात करण्यात आली.या गणपतीच्या दागिन्यांसोबतच या मूर्तीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे ही मूर्ती पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे. ही पूर्ण मूर्ती शाडूची बनलेली असते आणि त्यामुळेच तिच्या सुरक्षेसाठी विशेष काळजीही घेतली जाते. गणेशमूर्तीसमोर दररोज होणार्‍या वेगवेगळया पूजा यांमुळेही हा गणपती खूप प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा अशी त्याची ख्याती आहे .या गणपतीवर चढवले जाणारे दागिने अगदी नेत्रदिपक असतात. हा गणेशोत्सोव 5 दिवसांचा असतो. यावर्षीचं वैशिष्ठ्य म्हणजे या गणेशमूर्तीवर 70 किलो सोन्याचे दागिने आणि 470 किलो चांदीचे दागिने सजवण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमत 21 कोटी 50 लाख रूपये आहे. 5 दिवसांच्या या गणेशोत्सवात हजारो गणेशभक्त या गणेशाचं दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात. सुरक्षेसाठी gsb मंडळाने मंडपात 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत . तसेच 450 सिक्युरीटी गार्डस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत.

लालबागच्या राजाच्या दर्शनाला रिघ

तर दुसरीकडे राजांचा राजा लालबागचा राजा...नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असेलेला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशी पहाटेपासूनच भक्तांची रिघ लागली आहे. या मंडळाचं 79 वं वर्ष आहे. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठीच्या तीन रांगा, आणि नवसाची एक रांग आहे.

कोल्हापुरात पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाचं स्वागत

कोल्हापुरमध्ये पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाचं स्वागत करण्यात आलं. सकाळी 7 पासूनचं नागरिकांनी आपापल्या घरचे गणपती आणण्यास सुरुवात केल्याचं चित्र शहरात पहायला मिळालं. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कालपासूनच गणपती बाप्पाला जंगी मिरवणुकीद्वारे नेण्यास सुरुवात केली. गणपती बाप्पाच्या या स्वागतामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. अनेक मंडळांनी डॉल्बीला फाटा देत लेझिम पथकं, बँड पथकं यांना पसंती दिली. या वाद्यांच्या आवाजांनी शहरातले सर्वच रस्ते गजबजून गेले होते. गणपती बाप्पाच्या स्वागतावेळी अनेक मंडळांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकंही करुन दाखवली. तर काही मंडळांनी आकर्षक फलकांद्वारे सामाजिक संदेश दिले. त्यात लेक वाचवा अभियानाला अनेकर मंडळांनी पसंती दिली.

नाशकात उत्साह शिगेला

अत्यंत मोहक अशा गणपतीच्या मूर्ती , फळं पत्री , सजावटीचं साहित्य आणि ढोलताशांचा गजर यानं नाशिकचे रस्ते फुलुन गेले आहे. एकाचवेळेस घरगुती गणपती नेण्यासाठी आलेली कुटुंब आणि सार्वजनिक गणपती नेण्यासाठी आलेले मंडळाचे कार्यकर्ते यांची गर्दी झाली होती.

कोकणात बाप्पा मोरया रे

कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या महानगरात वसलेले चाकरमानी काल संध्याकळीच कोकणात दाखल झालेत आणि आज सकाळपासूनच आपल्या लाडक्या गणेशाला घरी नेण्यासाठी एकच गर्दी झाली आहे. मुंबईइतक्या मोठ्या अवाढव्य आकाराच्या नसल्या तरी तितक्याच आकर्षक आणि विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. मुंबईसारख्या अनेक महानगरात आता आदल्या दिवशीच मूर्ती आणण्याचा ट्रेंड आलाय पण अजूनही कोकणात मात्र अजूनही आजच्या दिवशीच मूर्ती आणण्याचा प्रघात अनेक ठिकाणी आहे. कुडाळमध्येही हिरव्यागार रस्त्यांमधून ही मूर्ती घेऊन घरी जाणारे अनेकजण पहायला मिळतात. सकाळी लवकर उठून मूर्तीशाळेतून मूर्ती आणण्याची लगबग अशी कोकणात सर्वत्रच पहायला मिळते.

औरंगाबादमध्ये गणेशोत्सव उत्साहात

औरंगाबादमध्ये गणेशभक्तांचा उत्साह सकाळपासूनच दिसत आहे. आपल्या आवडत्या बाप्पाला घर घेऊन जाण्यासाठी गणेशभक्तांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर गर्दी केलीय. गणेशाच्या मुर्तीच्या दुकानाबरोबर पुजेच्या साहित्याची दुकानंातही गणेशभक्त गर्दी करताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2012 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close