S M L

अण्णांच्या टीमचे 'विसर्जन'

19 सप्टेंबरजनलोकपाल विधेयकासाठी एकत्र आलेल्या टीम अण्णांना बरखास्त झाल्यानंतर आज टीमचं पुर्णपणे 'विसर्जन' झालंय. आमची टीम आता पूर्णपणे वेगळी झाली आहे. अरविंद केजरीवाल यांचा मार्ग वेगळा आहे माझा मार्ग वेगळा आहे. त्यांना निवडणूक लढ्याची आहे तर त्यांनी खुशाल लढावी पण लोकपालसाठी माझा लढा कायम सुरु असणार आहे जर लोकपाल विधेयक 2014 च्या निवडणुकीपुर्वी आणले नाही तर मी देहत्याग करेन अशा इशारा अण्णा हजारे यांनी दिला. टीम तुटली याचं दुख होतं आहे अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली.भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांनी देशव्यापी जनआंदोलन केलं. या आंदोलनात अण्णांच्या सोबत इंडिया अगेन्सट करप्शनचे अरविंद केजरीवाल, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, मनीष सिसोदिया, शांती भूषण, प्रशांत भूषण यांच्यासह अन्य सदस्य सहभागी झाले होते. या चमूचं 'टीम अण्णा' म्हणून नामकरण झालं. 5 एप्रिल 2011 ला अण्णांनी लोकपाल विधेयकासाठी पहिले उपोषण केले आणि अख्खा भारत या आंदोलनामुळे ढवळून निघाला. या आंदोलनामुळे जनतेच्या भावनांना या मार्ग मोकळा करुन दिला. देशाभरातून लोकं रस्त्यावर उतरली. या आंदोलनामुळे सरकारला एकच हादरा बसला आणि टीम अण्णा प्रकाशझोतात आली. या मागणीनंतर ऑगस्ट महिन्यात दुसरे आंदोलन झाले तेव्हाही लोकांच्या सहभागाने सरकारला नमते घ्यावे लागले. टीम अण्णांचे एकक पाऊल पुढे पडत असताना वेगवेगळा वादांनी घेरली गेली. हे वाद इतके विकोपाला गेले की, टीममध्येच फूट पडली. अण्णा-केजरीवाल, बेदी-केजरीवाल यांच्यातील मतभेद अनेकवेळा समोर आली. पण अण्णांनी सर्वांना सांभाळून घेत सर्व काही सुरळीत केलं. पण दोन महिन्यापुर्वी टीम अण्णांचे जंतरमंतरवर आंदोलन झाले. मात्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. टीम अण्णांने नवा पर्याय देत राजकीय पक्षाची घोषणा केली. आणि इथंच ठिणगी पडली. केजरीवाल यांनी पक्ष काढण्याच्या तयारीला लागले तर अण्णांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला. आंदोलन संपल्यानंतर अण्णांनी टीम अण्णा बरखास्त केली. टीम बरखास्तीनंतर अण्णा महिनाभर 'अंडरग्राऊंड' झाले. इकडे पुन्हा एकदा केजरीवाल-बेदी यांच्या मतभेद चव्हाट्यावर आले. निमित्त होतं केजरीवाल यांनी भाजपच्या नेत्यांना घेराव घातला यावरुन. याला बेदींचा विरोध होता. यावेळी बेदी यांनी तर मी अण्णांच्या सोबतच असणार असं सांगून केजरीवाल यांच्यावर टीका केली. अण्णांनी तात्काळ टीम अण्णांची राळेगणसिध्दीला बैठक घेतली. पुन्हा एकद सर्वकाही ठीक आहे असं स्पष्ट केलं. पण टीममधली धुसफूस काही थांबायचं नाव घेईना. अखेर आज अण्णांनी दिल्लीत नवी आणि धक्कादायक भूमिका स्पष्ट केली. आमची टीम पूर्णपणे तुटली आहे. टीम तुटली हे खूप दुदैर्वी आहे. केजरीवाल यांचा आणि माझा मार्ग वेगळा आहे पण आमचं ध्येय एकच आहे. जरी त्यांनी पक्ष काढला तर त्यांनी माझा फोटो,माझं नाव वापरु नये. मी निवडणूक लढवणार नाही. माझा लढा भ्रष्टाचाराविरोधात आहे. 2014 च्या निवडणुकांअगोदर सरकारने लोकपाल विधेयक आणावे अन्यथा मी देहत्याग करेन असा इशारा अण्णांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2012 01:58 PM IST

अण्णांच्या टीमचे 'विसर्जन'

19 सप्टेंबर

जनलोकपाल विधेयकासाठी एकत्र आलेल्या टीम अण्णांना बरखास्त झाल्यानंतर आज टीमचं पुर्णपणे 'विसर्जन' झालंय. आमची टीम आता पूर्णपणे वेगळी झाली आहे. अरविंद केजरीवाल यांचा मार्ग वेगळा आहे माझा मार्ग वेगळा आहे. त्यांना निवडणूक लढ्याची आहे तर त्यांनी खुशाल लढावी पण लोकपालसाठी माझा लढा कायम सुरु असणार आहे जर लोकपाल विधेयक 2014 च्या निवडणुकीपुर्वी आणले नाही तर मी देहत्याग करेन अशा इशारा अण्णा हजारे यांनी दिला. टीम तुटली याचं दुख होतं आहे अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली.

भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांनी देशव्यापी जनआंदोलन केलं. या आंदोलनात अण्णांच्या सोबत इंडिया अगेन्सट करप्शनचे अरविंद केजरीवाल, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, मनीष सिसोदिया, शांती भूषण, प्रशांत भूषण यांच्यासह अन्य सदस्य सहभागी झाले होते. या चमूचं 'टीम अण्णा' म्हणून नामकरण झालं. 5 एप्रिल 2011 ला अण्णांनी लोकपाल विधेयकासाठी पहिले उपोषण केले आणि अख्खा भारत या आंदोलनामुळे ढवळून निघाला. या आंदोलनामुळे जनतेच्या भावनांना या मार्ग मोकळा करुन दिला. देशाभरातून लोकं रस्त्यावर उतरली. या आंदोलनामुळे सरकारला एकच हादरा बसला आणि टीम अण्णा प्रकाशझोतात आली.

या मागणीनंतर ऑगस्ट महिन्यात दुसरे आंदोलन झाले तेव्हाही लोकांच्या सहभागाने सरकारला नमते घ्यावे लागले. टीम अण्णांचे एकक पाऊल पुढे पडत असताना वेगवेगळा वादांनी घेरली गेली. हे वाद इतके विकोपाला गेले की, टीममध्येच फूट पडली. अण्णा-केजरीवाल, बेदी-केजरीवाल यांच्यातील मतभेद अनेकवेळा समोर आली. पण अण्णांनी सर्वांना सांभाळून घेत सर्व काही सुरळीत केलं. पण दोन महिन्यापुर्वी टीम अण्णांचे जंतरमंतरवर आंदोलन झाले. मात्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. टीम अण्णांने नवा पर्याय देत राजकीय पक्षाची घोषणा केली. आणि इथंच ठिणगी पडली. केजरीवाल यांनी पक्ष काढण्याच्या तयारीला लागले तर अण्णांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला.

आंदोलन संपल्यानंतर अण्णांनी टीम अण्णा बरखास्त केली. टीम बरखास्तीनंतर अण्णा महिनाभर 'अंडरग्राऊंड' झाले. इकडे पुन्हा एकदा केजरीवाल-बेदी यांच्या मतभेद चव्हाट्यावर आले. निमित्त होतं केजरीवाल यांनी भाजपच्या नेत्यांना घेराव घातला यावरुन. याला बेदींचा विरोध होता. यावेळी बेदी यांनी तर मी अण्णांच्या सोबतच असणार असं सांगून केजरीवाल यांच्यावर टीका केली. अण्णांनी तात्काळ टीम अण्णांची राळेगणसिध्दीला बैठक घेतली. पुन्हा एकद सर्वकाही ठीक आहे असं स्पष्ट केलं. पण टीममधली धुसफूस काही थांबायचं नाव घेईना. अखेर आज अण्णांनी दिल्लीत नवी आणि धक्कादायक भूमिका स्पष्ट केली. आमची टीम पूर्णपणे तुटली आहे. टीम तुटली हे खूप दुदैर्वी आहे. केजरीवाल यांचा आणि माझा मार्ग वेगळा आहे पण आमचं ध्येय एकच आहे. जरी त्यांनी पक्ष काढला तर त्यांनी माझा फोटो,माझं नाव वापरु नये. मी निवडणूक लढवणार नाही. माझा लढा भ्रष्टाचाराविरोधात आहे. 2014 च्या निवडणुकांअगोदर सरकारने लोकपाल विधेयक आणावे अन्यथा मी देहत्याग करेन असा इशारा अण्णांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2012 01:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close