S M L

निकृष्ट बांधकामामुळे 40 कोटी पाण्यात

25 सप्टेंबरविदर्भातल्या सिंचन गैरव्यवहाराने कळस गाठला आहे. गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याचं बांधकाम निकृष्ट असल्याचं चौकशीत उघड झालं आणि त्यानंतर गोसखुर्दसाठी बांधलेला 23 किमीचा डावा कालवा आता तोडला जातोय. बांधकाम झालेला कालवा तोडल्याने 40 कोटींचा चुराडा झाला आहे. या कालव्याचं कंत्राट ज्यांना मिळालंय ते कंत्राटदार मितेश भांगडिया आहे आणि आता ते भाजपचे आमदार आहेत.विदर्भातील सिंचनाच्या क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी गोसेखुर्द धरणच्या बांधकामाला सुरूवात होवून आज जवळ पास पंचवीस वर्ष लोटले जेव्हा या धरणात आता पाणी अडवायला सुरूवात झाली त्यावेळी या धरणाचया निकृष्ठ बांधकामाच पितळ उघड पडलंय तेवीस किलोमिटरच्या 40 कोटी खर्चाचं पूर्ण कॅनल निकृष्ठ बांधकामामुळे तोडण्यात येतय यामुळे या धरणाच्या बांधकामावरच प्रश्न उपस्थीत झाला आहे.गोसखुर्दच्या डाव्या कालव्याच्या तेवीस किलोमिटर लांब असलेल्या या कॅनल वर सध्या बांधकामासाठी नाहीत तर बांधकाम तोडण्यासाठी मजूर काम करत आहेत. 1988 मध्ये राजीव गांधीच्या उपस्थितीत या धरणाच्या कामाला सुरूवात झाली होती या धरणामुळे भंडारा चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील बराच भाग सिंचना खाली येणार होता त्यासाठी राज्य सरकारनं कोट्यावधी चा खर्च केला. 23 किलोमिटर चा भला मोठा कॅनल बांधण्याच काम श्रीनिवास कंस्ट्रक्शन कंपनीला आणि त्याच्या इतर भागीदारांना देण्यात आलं होतं पण बांधकाम सुरू असतांनाच याच्या कामा बद्दल अनेक तक्रारी येत होत्या आणि आता ते सिद्द झालं. गोसेखुर्द धरणाचं काम 1988 मध्ये ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी पूर्ण बांधकामाचा खर्च 376 कोटी निर्धारित करण्यात आला होतो पण नव्वदच्या दशकानंतर कामाच्या खर्चात वाढ झाली आणि आता या धरणाचा खर्च 7 हजार कोटीच्या वर गेला. कॅनलच निकृष्ठ बांधकाम लक्षात आल्यावर सरकारनं या कंत्राटदाराला या कॅनलच पुन्हा बांधकाम करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्रा बाहेरचे अनेक कंत्राटदार गोसेखुर्द मध्ये काम करत आहे अनेक दा अडगळीत पडलेल्या धरणाच्या कामाला गती मिळाली जेव्हा केंद्र सरकारनं या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला यामुळे पैसा ही मोठ्या प्रंमाणात येतोय पण या धरणाच्या बांधकाची उच्च स्थरीय चौकसी करण्याची मागणी होते आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2012 10:50 AM IST

निकृष्ट बांधकामामुळे 40 कोटी पाण्यात

25 सप्टेंबर

विदर्भातल्या सिंचन गैरव्यवहाराने कळस गाठला आहे. गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याचं बांधकाम निकृष्ट असल्याचं चौकशीत उघड झालं आणि त्यानंतर गोसखुर्दसाठी बांधलेला 23 किमीचा डावा कालवा आता तोडला जातोय. बांधकाम झालेला कालवा तोडल्याने 40 कोटींचा चुराडा झाला आहे. या कालव्याचं कंत्राट ज्यांना मिळालंय ते कंत्राटदार मितेश भांगडिया आहे आणि आता ते भाजपचे आमदार आहेत.

विदर्भातील सिंचनाच्या क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी गोसेखुर्द धरणच्या बांधकामाला सुरूवात होवून आज जवळ पास पंचवीस वर्ष लोटले जेव्हा या धरणात आता पाणी अडवायला सुरूवात झाली त्यावेळी या धरणाचया निकृष्ठ बांधकामाच पितळ उघड पडलंय तेवीस किलोमिटरच्या 40 कोटी खर्चाचं पूर्ण कॅनल निकृष्ठ बांधकामामुळे तोडण्यात येतय यामुळे या धरणाच्या बांधकामावरच प्रश्न उपस्थीत झाला आहे.

गोसखुर्दच्या डाव्या कालव्याच्या तेवीस किलोमिटर लांब असलेल्या या कॅनल वर सध्या बांधकामासाठी नाहीत तर बांधकाम तोडण्यासाठी मजूर काम करत आहेत. 1988 मध्ये राजीव गांधीच्या उपस्थितीत या धरणाच्या कामाला सुरूवात झाली होती या धरणामुळे भंडारा चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील बराच भाग सिंचना खाली येणार होता त्यासाठी राज्य सरकारनं कोट्यावधी चा खर्च केला. 23 किलोमिटर चा भला मोठा कॅनल बांधण्याच काम श्रीनिवास कंस्ट्रक्शन कंपनीला आणि त्याच्या इतर भागीदारांना देण्यात आलं होतं पण बांधकाम सुरू असतांनाच याच्या कामा बद्दल अनेक तक्रारी येत होत्या आणि आता ते सिद्द झालं.

गोसेखुर्द धरणाचं काम 1988 मध्ये ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी पूर्ण बांधकामाचा खर्च 376 कोटी निर्धारित करण्यात आला होतो पण नव्वदच्या दशकानंतर कामाच्या खर्चात वाढ झाली आणि आता या धरणाचा खर्च 7 हजार कोटीच्या वर गेला. कॅनलच निकृष्ठ बांधकाम लक्षात आल्यावर सरकारनं या कंत्राटदाराला या कॅनलच पुन्हा बांधकाम करण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्रा बाहेरचे अनेक कंत्राटदार गोसेखुर्द मध्ये काम करत आहे अनेक दा अडगळीत पडलेल्या धरणाच्या कामाला गती मिळाली जेव्हा केंद्र सरकारनं या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला यामुळे पैसा ही मोठ्या प्रंमाणात येतोय पण या धरणाच्या बांधकाची उच्च स्थरीय चौकसी करण्याची मागणी होते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2012 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close