S M L

गर्भपात प्रकरणी सरस्वती मुंडेंना जामीन मंजूर

25 सप्टेंबरस्त्री भ्रूण हत्येप्रकरणी राज्यभरात गाजलेल्या डॉ. सरवस्वती मुंडे यांना जामीन मिळाला आहे. 3 लाखाच्या जातमुचलक्यावर अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विजयमाला पटेकर यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. सरस्वती मुंडे सध्या नाशिकच्या कारागृहात आहेत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं याआधी त्याचं प्रॅक्टीस करण्याचा परवाना 5 वर्षांसाठी रद्द केला आहे. आता, कोर्टाने त्यांना जामीन मंजूर करताना काही अटी घातल्यात. एक दिवसाआड परळी पोलीस स्टेशनला हजेरी बंधनकारक करण्यात आलीय. तसेच परळी पोलीस स्टेशनची हद्द न सोडण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. शिवाय खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रॅक्टीस करण्यात प्रतिबंध घालण्यात आलाय. दरम्यान सरकारी पक्ष या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2012 10:01 AM IST

गर्भपात प्रकरणी सरस्वती मुंडेंना जामीन मंजूर

25 सप्टेंबर

स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी राज्यभरात गाजलेल्या डॉ. सरवस्वती मुंडे यांना जामीन मिळाला आहे. 3 लाखाच्या जातमुचलक्यावर अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विजयमाला पटेकर यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. सरस्वती मुंडे सध्या नाशिकच्या कारागृहात आहेत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं याआधी त्याचं प्रॅक्टीस करण्याचा परवाना 5 वर्षांसाठी रद्द केला आहे. आता, कोर्टाने त्यांना जामीन मंजूर करताना काही अटी घातल्यात. एक दिवसाआड परळी पोलीस स्टेशनला हजेरी बंधनकारक करण्यात आलीय. तसेच परळी पोलीस स्टेशनची हद्द न सोडण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. शिवाय खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रॅक्टीस करण्यात प्रतिबंध घालण्यात आलाय. दरम्यान सरकारी पक्ष या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2012 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close