S M L

सुरेश पठारेंनी फिरवली अण्णांकडे पाठ

23 सप्टेंबरअण्णा हजारे यांच्या टीमचे 'विसर्जन' झाल्यानंतर आता उरलेली पानही गळायला लागली आहे. अण्णांच्या गावचे आणि त्यांचे खास सहकारी सुरेश पठारे यांनी अण्णांना सोडचिठ्ठी दिली आहे. आपण वैयक्तीक कारणामुळे अण्णांपासून दूर होतं आहोत असं पठारे यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी देशव्यापी आंदोलन उभारले. अरंविद केजरीवाल,किरण बेदी, शांती भूषण,संतोष हेगडे,प्रशांत भूषण अशा जोडीदारांना घेऊन अण्णांनी नव्या क्रांतीची ज्योत पेटवली. पण आजपर्यंत झालेली जनआंदोलनं, चळवळींची शेवटला जी अवस्था झाली तशीच अवस्था अण्णांच्या आंदोलनाची झाली आहे. राजकीय पक्ष काढण्यावरुन केजरीवाल आणि अण्णांमध्ये मतभेद उघड झाली. अण्णांनीही मतभेद झाल्याचं कबूल करत टीम अण्णा विसर्जित केली. केजरीवाल यांचा मार्ग वेगळा आहे असं सांगून अण्णा आपल्या मार्गाने वेगळे निघाले. पण अण्णांच्या सोबत राळेगण ते दिल्लीपर्यंत सोबत असणारे सुरेश पठारे आज अण्णांपासून दूर झाले आहे. राळेगण असोवा जंतरमंतर अण्णांशी संपर्क साधायचा म्हटलं तर अण्णांशी संपर्क म्हणजेच पठारेंशी संपर्क असं काही समिकरण तयार झालं होतं. कित्येक वेळा अण्णांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पठारे सदैव माध्यमांना सामोरं जातं असतं. एवढंच नाही तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अण्णांच्या विरोधात राळेगणवर धडकमोर्चा काढला होता तेव्हा पठारे यांनी सर्वांना पिटाळून लावले होते. काल शनिवारी सुरेश पठारे यांनी आपल्या ट्विटरवर वैयक्तीक कामासाठी अण्णांपासून आपण दूर होतं असल्याचं जाहीर केलं. एकंदरीतच अण्णांची टीम आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. पण मार्ग जरी वेगळी असले तरी ध्येय एकच असल्याचं अण्णा म्हणत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2012 10:11 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2012 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close