S M L

अजितदादांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीत चढाओढ

26 सप्टेंबरअजित पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांना समर्थन देण्यासाठी राज्यात मंत्री आणि आमदारांमध्ये स्पर्धा लागली आहे. सर्व मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे राजीनामे सोपवले तर अजित पवार समर्थक आमदारांची बैठकही होतेय. मात्र शरद पवारांनी या हालचालींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांना फोन करून शरद पवारांनी जाब विचारल्याचीही माहिती आहे. काल मंगळवारी पवारांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना सरकार अस्थिर होणार नाही असं म्हटलं होतं. तसा कोणी प्रयत्नही करू नये निर्णय घेण्याचा अधिकार फक्त पक्षश्रेष्ठींनाच आहे असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. मात्र होतय सगळं उलटंच राष्ट्रवादीचे आमदार उघड उघड काँग्रेसविरोधात सुर लावत आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी थेट पाठिंबा काढून घ्या अशा घोषणा दिल्या होत्या. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निरालाबाजार भागात रास्ता रोको करुन काँग्रेसच्या विरोधात निदर्शनं केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2012 08:35 AM IST

अजितदादांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीत चढाओढ

26 सप्टेंबर

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांना समर्थन देण्यासाठी राज्यात मंत्री आणि आमदारांमध्ये स्पर्धा लागली आहे. सर्व मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे राजीनामे सोपवले तर अजित पवार समर्थक आमदारांची बैठकही होतेय. मात्र शरद पवारांनी या हालचालींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांना फोन करून शरद पवारांनी जाब विचारल्याचीही माहिती आहे. काल मंगळवारी पवारांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना सरकार अस्थिर होणार नाही असं म्हटलं होतं. तसा कोणी प्रयत्नही करू नये निर्णय घेण्याचा अधिकार फक्त पक्षश्रेष्ठींनाच आहे असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. मात्र होतय सगळं उलटंच राष्ट्रवादीचे आमदार उघड उघड काँग्रेसविरोधात सुर लावत आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी थेट पाठिंबा काढून घ्या अशा घोषणा दिल्या होत्या. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निरालाबाजार भागात रास्ता रोको करुन काँग्रेसच्या विरोधात निदर्शनं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2012 08:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close