S M L

अजित पवारांचा आज फैसला ?

28 सप्टेंबरउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन राज्याच्या राजकारणाला वेगळंच वळण दिलंय. अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस खिंडीत सापडली तर राष्ट्रवादीलाही चांगलाच धक्का बसला. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनाम्यावर पुनर्विचार होणार नाही असं म्हटलं तर काँग्रेस हायकमांडने राजीनामा स्वीकारावा असे आदेश दिले आहे. त्यामुळे उद्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेतला जाणार आणि मुख्यमंत्री यानंतर काय निर्णय घेणार यावर अजित पवारांचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. कुणी अजित पवारांच्या तर कुणी शरद पवारांच्या नावानं घोषणा देत आहे. तर कुणी मुख्यमंत्र्यांच्या नावानं शिमगा करतोय. पण राष्ट्रवादीने कितीही तिरकी चाल खेळली तरी गोंधळून जायचं नाही, असं काँग्रेसनं ठरवलंय. त्यामुळंच काँग्रेसनं आमदारांची बैठक घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला.तिकडे अस्वस्थ राष्ट्रवादीची शुक्रवारच्या शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक होईल. पण आयबीएन नेटवर्कशी बोलताना मात्र शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की, आता अजित पवारांच्या राजीनाम्यावर पुनर्विचार केला जाणार नाही. असं वक्तव्य करून काकांनी अजितदादांच्या परतीचा मार्ग बंदकेल्याचं मानलं जातंय. त्यामुळं अजित पवारांचे समर्थक आमदार बुचकळ्यात पडले आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती असताना विरोधीपक्षांनी त्यांची कोंडी केली नसती.. तरच नवल.सिंचन घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला खरा पण आता अजित पवारांची खरंच पंचाईत झालीय. नेमकं काय करायचं, असा पेच त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. राजीनामा दिला तर सत्ता जाते आणि राजीनामा मागे घेतला तर बोले तैसा चाले, या आपल्या प्रतिमेला तडा जाईल असं द्वंद्व अजित दादांसमोर उभं ठाकलंय. अजित पवारांनी एकाएकी राजीनामा दिल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झालाय. अजितदादांच्या नाराजीनाट्यावरून अनेक तर्क-वितर्क किंवा शक्य-शक्यतांची सध्या चर्चा सुरू आहेत. पुढे काय-काय होऊ शकतं, त्यावर एक नजर टाकूया...शक्यता पहिलीअजित पवारांनी राजीनामा मागे घेतला तर... - आघाडी सरकारमधली अस्थिरता दूर होईल- बोले तैसा चाले, या दादांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो- काँग्रेसला राष्ट्रवादीच्या अटी-शर्थी मान्य कराव्या लागतील- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या अधिकारावर मर्यादा येऊ शकतात- राष्ट्रवादीच्या खात्यांमधला मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप कमी होऊ शकतोशक्यता दुसरीअजित पवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला तर... - अजित पवार सरकारबाहेर राहिले, तर काँग्रेसला जास्त त्रासदायक ठरतील- आघाडी सरकार अस्थिर होऊ शकतं- अजित पवार प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात- प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत, तर मात्र अजित दादांची कोंडी होईल- विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून कायम राहतील- अजितदादा शक्तिप्रदर्शन करून शरद पवारांना झुकवू शकतात

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2012 04:21 PM IST

अजित पवारांचा आज फैसला ?

28 सप्टेंबर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन राज्याच्या राजकारणाला वेगळंच वळण दिलंय. अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस खिंडीत सापडली तर राष्ट्रवादीलाही चांगलाच धक्का बसला. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनाम्यावर पुनर्विचार होणार नाही असं म्हटलं तर काँग्रेस हायकमांडने राजीनामा स्वीकारावा असे आदेश दिले आहे. त्यामुळे उद्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेतला जाणार आणि मुख्यमंत्री यानंतर काय निर्णय घेणार यावर अजित पवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. कुणी अजित पवारांच्या तर कुणी शरद पवारांच्या नावानं घोषणा देत आहे. तर कुणी मुख्यमंत्र्यांच्या नावानं शिमगा करतोय. पण राष्ट्रवादीने कितीही तिरकी चाल खेळली तरी गोंधळून जायचं नाही, असं काँग्रेसनं ठरवलंय. त्यामुळंच काँग्रेसनं आमदारांची बैठक घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला.

तिकडे अस्वस्थ राष्ट्रवादीची शुक्रवारच्या शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक होईल. पण आयबीएन नेटवर्कशी बोलताना मात्र शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की, आता अजित पवारांच्या राजीनाम्यावर पुनर्विचार केला जाणार नाही. असं वक्तव्य करून काकांनी अजितदादांच्या परतीचा मार्ग बंदकेल्याचं मानलं जातंय. त्यामुळं अजित पवारांचे समर्थक आमदार बुचकळ्यात पडले आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती असताना विरोधीपक्षांनी त्यांची कोंडी केली नसती.. तरच नवल.

सिंचन घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला खरा पण आता अजित पवारांची खरंच पंचाईत झालीय. नेमकं काय करायचं, असा पेच त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. राजीनामा दिला तर सत्ता जाते आणि राजीनामा मागे घेतला तर बोले तैसा चाले, या आपल्या प्रतिमेला तडा जाईल असं द्वंद्व अजित दादांसमोर उभं ठाकलंय.

अजित पवारांनी एकाएकी राजीनामा दिल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झालाय. अजितदादांच्या नाराजीनाट्यावरून अनेक तर्क-वितर्क किंवा शक्य-शक्यतांची सध्या चर्चा सुरू आहेत. पुढे काय-काय होऊ शकतं, त्यावर एक नजर टाकूया...

शक्यता पहिलीअजित पवारांनी राजीनामा मागे घेतला तर...

- आघाडी सरकारमधली अस्थिरता दूर होईल- बोले तैसा चाले, या दादांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो- काँग्रेसला राष्ट्रवादीच्या अटी-शर्थी मान्य कराव्या लागतील- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या अधिकारावर मर्यादा येऊ शकतात- राष्ट्रवादीच्या खात्यांमधला मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप कमी होऊ शकतोशक्यता दुसरीअजित पवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला तर...

- अजित पवार सरकारबाहेर राहिले, तर काँग्रेसला जास्त त्रासदायक ठरतील- आघाडी सरकार अस्थिर होऊ शकतं- अजित पवार प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात- प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत, तर मात्र अजित दादांची कोंडी होईल- विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून कायम राहतील- अजितदादा शक्तिप्रदर्शन करून शरद पवारांना झुकवू शकतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2012 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close