S M L

'अजित पवारांनी राजीनामा मागे घ्यावा'

26 सप्टेंबरआम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहे. अजित पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे. त्यांच्या राजीनाम्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार योग्य तो निर्णय घेतील त्यांचा निर्णय हा अंतिम राहील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिली. आज राष्ट्रवादीच्या आमदार,खासदार, मंत्र्यांची विधिमंडळाची बैठक पार पडली. माजी विधानसभा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब कुपेकर यांचे आज कर्करोगामुळे निधन झालं. त्यामुळे आज कोणतीही राजकीय चर्चा केली जाणार नसल्याचं पिचड सांगितलं. येत्या 28 तारखेला शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. ही बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. या बैठकीत शरद पवारांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे.सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा दिला आणि राज्यातल्या राजकारणाला नाट्यमय वळण लागलं. राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्यकर्ते मुंबईत जमले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आणि बैठकीबाहेर.. सगळ्यांनी दादांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. या निमित्ताने सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या अजित पवारांनी शक्तिप्रदर्शनही केलं. पण अपेक्षेप्रमाणेच या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. येत्या शुक्रवारी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. त्या दिवशीच या नाट्यावर पडदा पडेल, अशी दाट शक्यता आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित दादांची नाराजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवरच आहे. मेरीचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळ्याबद्दल लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यंानी परस्पर चौकशीचे आदेश दिल्यानं अजित पवार नाराज आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार किंवा सुनील तटकरे यांना विश्वासातही घेतली नाही. म्हणूनच पांढरेंच्या पत्रावरून राजकीय षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार बोलताय. यामुळेच ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे पुतळे जाळले. बीड, परभणी आणि नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. पण काँग्रेसमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ताबडतोब मुख्यमंत्र्यांना बदलण्याचा कोणताही विचार नाही.संबंधित बातम्या (कृपया हेडलाईनवर क्लिक करा)अजित पवारांचा राजीनामा अजितदादांचा निर्णय योग्यच -शरद पवार अजित पवारांवरील आरोपराज्यातलं सरकार अस्थिर करणार नाही -पवार आम्ही काँग्रेससोबतच राहणार -पटेल अजित पवारांची ही नौटंकी - उध्दव ठाकरे अजित पवारांचा राजीनामा म्हणजे धुळफेक -मुनगंटीवार

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2012 09:29 AM IST

'अजित पवारांनी राजीनामा मागे घ्यावा'

26 सप्टेंबर

आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहे. अजित पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे. त्यांच्या राजीनाम्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार योग्य तो निर्णय घेतील त्यांचा निर्णय हा अंतिम राहील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिली. आज राष्ट्रवादीच्या आमदार,खासदार, मंत्र्यांची विधिमंडळाची बैठक पार पडली. माजी विधानसभा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब कुपेकर यांचे आज कर्करोगामुळे निधन झालं. त्यामुळे आज कोणतीही राजकीय चर्चा केली जाणार नसल्याचं पिचड सांगितलं. येत्या 28 तारखेला शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. ही बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. या बैठकीत शरद पवारांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे.

सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा दिला आणि राज्यातल्या राजकारणाला नाट्यमय वळण लागलं. राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्यकर्ते मुंबईत जमले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आणि बैठकीबाहेर.. सगळ्यांनी दादांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली.

या निमित्ताने सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या अजित पवारांनी शक्तिप्रदर्शनही केलं. पण अपेक्षेप्रमाणेच या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. येत्या शुक्रवारी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. त्या दिवशीच या नाट्यावर पडदा पडेल, अशी दाट शक्यता आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित दादांची नाराजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवरच आहे. मेरीचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळ्याबद्दल लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यंानी परस्पर चौकशीचे आदेश दिल्यानं अजित पवार नाराज आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार किंवा सुनील तटकरे यांना विश्वासातही घेतली नाही. म्हणूनच पांढरेंच्या पत्रावरून राजकीय षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार बोलताय.

यामुळेच ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे पुतळे जाळले. बीड, परभणी आणि नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. पण काँग्रेसमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ताबडतोब मुख्यमंत्र्यांना बदलण्याचा कोणताही विचार नाही.

संबंधित बातम्या (कृपया हेडलाईनवर क्लिक करा)

अजित पवारांचा राजीनामा अजितदादांचा निर्णय योग्यच -शरद पवार अजित पवारांवरील आरोपराज्यातलं सरकार अस्थिर करणार नाही -पवार आम्ही काँग्रेससोबतच राहणार -पटेल अजित पवारांची ही नौटंकी - उध्दव ठाकरे अजित पवारांचा राजीनामा म्हणजे धुळफेक -मुनगंटीवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2012 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close