S M L

दादांचा निर्णय योग्य, सरकारला धोका नाही -पवार

26 सप्टेंबरसिंचन प्रकल्पावरुन होत असलेल्या आरोपामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थ आणि ऊर्जा खात्याचा राजीनामा दिला त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. त्यांच्या हा धाडसी निर्णय कौतुकास्पद आहे. या धाडसाबद्दल मला आनंद झाला असून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाही. आम्हाला सरकार चालवायचंय आहे. आम्हाला सरकार अस्थिर करायचं नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. शरद पवार यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. काल मंगळवारी अजित पवार यांनी तडकाफडकी उपमुख्यमंत्रीपदाचा,अर्थ खाते आणि ऊर्जा खात्याचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एकच हादरा बसला. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही काही तासात प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रवादीच्या या अचानक 'राजीनामास्त्र'मुळे काँग्रेससह इतर पक्ष अवाक् झाले. विरोधकांनी अजित पवारांचे हे नाटक आहे असा हल्लाबोल केला. पण खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांचे समर्थन करत त्यांची पाठ थोपटली. सरकार अस्थिर करणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. अजित पवार यांचा निर्णय योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं खरं सत्य जनतेसमोर आलं पाहिजे अशी इच्छा पवारांनी बोलून दाखवली. पण दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसविरोधात रस्त्यावर उतरले , मंत्र्यांनी राजीनामे दिले. एवढं सगळं होऊन सुध्दा शरद पवार यांनी पुन्हा एकदा आघाडी भक्कम असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे मला आनंद झाला आहे. त्यांचा निर्णय कौतुकास्पद आहे अशी पाठही थोपटली. आम्ही काँग्रेस सरकारसोबत आहोत आणि सरकार अस्थिर करणार नसल्याचं पवार पुन्हा एकदा स्पष्ट केलं.तसेच कोणत्याही मंत्र्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाही असंही पवार म्हणाले. आता शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2012 12:32 PM IST

दादांचा निर्णय योग्य, सरकारला धोका नाही -पवार

26 सप्टेंबर

सिंचन प्रकल्पावरुन होत असलेल्या आरोपामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थ आणि ऊर्जा खात्याचा राजीनामा दिला त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. त्यांच्या हा धाडसी निर्णय कौतुकास्पद आहे. या धाडसाबद्दल मला आनंद झाला असून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाही. आम्हाला सरकार चालवायचंय आहे. आम्हाला सरकार अस्थिर करायचं नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. शरद पवार यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

काल मंगळवारी अजित पवार यांनी तडकाफडकी उपमुख्यमंत्रीपदाचा,अर्थ खाते आणि ऊर्जा खात्याचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एकच हादरा बसला. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही काही तासात प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रवादीच्या या अचानक 'राजीनामास्त्र'मुळे काँग्रेससह इतर पक्ष अवाक् झाले. विरोधकांनी अजित पवारांचे हे नाटक आहे असा हल्लाबोल केला. पण खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांचे समर्थन करत त्यांची पाठ थोपटली. सरकार अस्थिर करणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. अजित पवार यांचा निर्णय योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं खरं सत्य जनतेसमोर आलं पाहिजे अशी इच्छा पवारांनी बोलून दाखवली. पण दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसविरोधात रस्त्यावर उतरले , मंत्र्यांनी राजीनामे दिले. एवढं सगळं होऊन सुध्दा शरद पवार यांनी पुन्हा एकदा आघाडी भक्कम असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे मला आनंद झाला आहे. त्यांचा निर्णय कौतुकास्पद आहे अशी पाठही थोपटली. आम्ही काँग्रेस सरकारसोबत आहोत आणि सरकार अस्थिर करणार नसल्याचं पवार पुन्हा एकदा स्पष्ट केलं.तसेच कोणत्याही मंत्र्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाही असंही पवार म्हणाले. आता शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2012 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close