S M L

अजित पवारांचा राजीनामा मंजूर

28 सप्टेंबरअखेर अजित पवारांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे. अजितदादांचा राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवारांनी मंजूर केला असून इतर मंत्र्यांचे राजीनामे फेटाळून लावले आहे. त्यामुळे आता अजित पवार मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहे. आज झालेल्या राष्ट्रवादीच्या निर्णायक बैठकीत शरद पवारांनी अजितदादांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केलंय. तसेच सिंचन घोटाळ्यातील सत्य जनतेसमोर यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी शरद पवारांनी केली. तसेच अजित पवार आणि माझ्यात कोणताही वाद नाही असंही पवारांनी ठणकावून सांगितलं. सिंचनावर लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करून राष्ट्रवादीने चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात टाकला आहे. दरम्यान, अजूनपर्यंत शरद पवारांकडून कुठलाही निरोप आला नाही असं मुख्यमंत्री कार्यालयातल्या सूत्रांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलंय. सिंचन प्रकल्प घोटाळ्यावरुन होत असलेल्या आरोपामुळे व्यथित होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 25 तारखेला तडकाफडकी राजीनामा देऊन सर्वांना एकच धक्का दिला. त्यांच्यापाठोपाठ सर्व मंत्र्यांनीही राजीनामे देईन आणखी एक झटका दिला. गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या वावटळामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. आणि अखेर आज या राजीनामा नाट्यावर पडदा पडला. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुंबईत दाखल झाले आणि पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन पक्षाची सूत्र आपल्या हाती घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, खुद्द अजित पवार, छगन भुजबळ,आर.आर.पाटील सर्व वरिष्ठ नेते हजर होते. त्यानंतर त्यांनी पक्षांच्या वरिष्ठांसोबत आणखी एक बैठक घेतली. आणि ठरल्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सर्व आमदार,खासदार,मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवारांनी भाषण केलं. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. शरद पवार हे माझे दैवत असून त्यांनी जो काही निर्णय घेतला तो आपल्याला मान्य असेल असं अजितदादांनी स्पष्ट केलं. पण मी आतापर्यंत केलेली कामं कुणाला दिसत नाही माझ्याविरोधात षडयंत्र रचले गेले आहे असा आरोपही त्यांनी केला. अजितदादांच्या भाषणानंतर सुप्रिया सुळे बैठकीतून बाहेर पडल्या. यानंतर शरद पवारांचे 10 मिनिटं भाषण झालं. आणि अखेर ज्या 'ब्रेकिंग न्यूज'ची प्रतिक्षा होती ती आदळली. अजित पवारांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या पाठोपाठ ज्या मंत्र्यांनी राजीनामे दिले ते शरद पवारांनी फेटाळून लावले आणि कामाला लागा असा आदेश दिला. बैठकीतून बाहेर आल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी बातचीत केली. सिंचन प्रकल्प घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी अजित पवारांनी राजीनामा दिला. त्यांचा हा निर्णय धाडसी होता. राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी असून घोटाळातील सत्य बाहेर यावी अशी आमची इच्छा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर श्वेतत्रिका काढवी अशी आमची मागणी आहे. अजित पवार आता मंत्रिमंडळातून बाहेर पडले असून ते आता पक्षाबांधणीसाठी काम करणार आहे. इतर मंत्र्यांचे राजीनामे फेटाळले असून त्यांनी उद्यापासूनच आपआपल्या कामाला लागावे असे आदेश देत राजीनामा नाट्यावर शरद पवारांनी पडदा टाकला आहे.राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी केलेलं भाषण 'शरद पवार हे माझं दैवत आहे. साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. कामं करणं हा काही गुन्हा असू शकत नाही. आम्ही प्रचंड कामं केली. पण केलेल्या कामांकडे मीडिया दुर्लक्ष करतं आणि भ्रष्टाचार्‍याच्या मुद्यावर वेगवेगळ्या विषयांना तोंड फोडतं. माझं काम मी प्रामाणिकपणे केलंय हे काळाच्या ओघात दिसेलच. आरोप दूर होईपर्यंत मी मंत्रिपद स्वीकारणार नाही. सरकारनं सिंचनावर लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढावी.'

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2012 12:07 PM IST

अजित पवारांचा राजीनामा मंजूर

28 सप्टेंबर

अखेर अजित पवारांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे. अजितदादांचा राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवारांनी मंजूर केला असून इतर मंत्र्यांचे राजीनामे फेटाळून लावले आहे. त्यामुळे आता अजित पवार मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहे. आज झालेल्या राष्ट्रवादीच्या निर्णायक बैठकीत शरद पवारांनी अजितदादांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केलंय. तसेच सिंचन घोटाळ्यातील सत्य जनतेसमोर यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी शरद पवारांनी केली. तसेच अजित पवार आणि माझ्यात कोणताही वाद नाही असंही पवारांनी ठणकावून सांगितलं. सिंचनावर लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करून राष्ट्रवादीने चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात टाकला आहे. दरम्यान, अजूनपर्यंत शरद पवारांकडून कुठलाही निरोप आला नाही असं मुख्यमंत्री कार्यालयातल्या सूत्रांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलंय.

सिंचन प्रकल्प घोटाळ्यावरुन होत असलेल्या आरोपामुळे व्यथित होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 25 तारखेला तडकाफडकी राजीनामा देऊन सर्वांना एकच धक्का दिला. त्यांच्यापाठोपाठ सर्व मंत्र्यांनीही राजीनामे देईन आणखी एक झटका दिला. गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या वावटळामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. आणि अखेर आज या राजीनामा नाट्यावर पडदा पडला. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुंबईत दाखल झाले आणि पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन पक्षाची सूत्र आपल्या हाती घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, खुद्द अजित पवार, छगन भुजबळ,आर.आर.पाटील सर्व वरिष्ठ नेते हजर होते. त्यानंतर त्यांनी पक्षांच्या वरिष्ठांसोबत आणखी एक बैठक घेतली. आणि ठरल्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सर्व आमदार,खासदार,मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवारांनी भाषण केलं. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. शरद पवार हे माझे दैवत असून त्यांनी जो काही निर्णय घेतला तो आपल्याला मान्य असेल असं अजितदादांनी स्पष्ट केलं. पण मी आतापर्यंत केलेली कामं कुणाला दिसत नाही माझ्याविरोधात षडयंत्र रचले गेले आहे असा आरोपही त्यांनी केला.

अजितदादांच्या भाषणानंतर सुप्रिया सुळे बैठकीतून बाहेर पडल्या. यानंतर शरद पवारांचे 10 मिनिटं भाषण झालं. आणि अखेर ज्या 'ब्रेकिंग न्यूज'ची प्रतिक्षा होती ती आदळली. अजित पवारांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या पाठोपाठ ज्या मंत्र्यांनी राजीनामे दिले ते शरद पवारांनी फेटाळून लावले आणि कामाला लागा असा आदेश दिला. बैठकीतून बाहेर आल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी बातचीत केली. सिंचन प्रकल्प घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी अजित पवारांनी राजीनामा दिला. त्यांचा हा निर्णय धाडसी होता. राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी असून घोटाळातील सत्य बाहेर यावी अशी आमची इच्छा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर श्वेतत्रिका काढवी अशी आमची मागणी आहे. अजित पवार आता मंत्रिमंडळातून बाहेर पडले असून ते आता पक्षाबांधणीसाठी काम करणार आहे. इतर मंत्र्यांचे राजीनामे फेटाळले असून त्यांनी उद्यापासूनच आपआपल्या कामाला लागावे असे आदेश देत राजीनामा नाट्यावर शरद पवारांनी पडदा टाकला आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी केलेलं भाषण

'शरद पवार हे माझं दैवत आहे. साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. कामं करणं हा काही गुन्हा असू शकत नाही. आम्ही प्रचंड कामं केली. पण केलेल्या कामांकडे मीडिया दुर्लक्ष करतं आणि भ्रष्टाचार्‍याच्या मुद्यावर वेगवेगळ्या विषयांना तोंड फोडतं. माझं काम मी प्रामाणिकपणे केलंय हे काळाच्या ओघात दिसेलच. आरोप दूर होईपर्यंत मी मंत्रिपद स्वीकारणार नाही. सरकारनं सिंचनावर लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढावी.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2012 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close