S M L

...तर काँग्रेसकडून कायदेशीर कारवाई का नाही ? -मोदी

02 ऑक्टोबरसोनिया गांधी यांच्या उपचारावर झालेल्या खर्चावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केलीय. उपचारांच्या खर्चासंबंधी वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्या खोट्या असतील तर काँग्रेसनं कायदेशीर कारवाई का केली नाही, असा सवाल मोदींनी विचारला आहे. भारतीय नागरिकाला सरकार खर्च करत असलेल्या पैशांचा जाब विचारण्याचा अधिकार नाही का, असंही मोदींनी म्हटलंय. सरकारनं सोनियांच्या उपचाराला लागेल तेवढा खर्च करावा, आपण इथं मानवतेच्या कार्यासाठीच बसलोय. पण जर जनतेनं त्याची माहिती मागितली तर पंतप्रधानांनी ती द्यावी, अशी जोरदार मागणी मोदींनी केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 2, 2012 11:10 AM IST

...तर काँग्रेसकडून कायदेशीर कारवाई का नाही ? -मोदी

02 ऑक्टोबर

सोनिया गांधी यांच्या उपचारावर झालेल्या खर्चावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केलीय. उपचारांच्या खर्चासंबंधी वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्या खोट्या असतील तर काँग्रेसनं कायदेशीर कारवाई का केली नाही, असा सवाल मोदींनी विचारला आहे. भारतीय नागरिकाला सरकार खर्च करत असलेल्या पैशांचा जाब विचारण्याचा अधिकार नाही का, असंही मोदींनी म्हटलंय. सरकारनं सोनियांच्या उपचाराला लागेल तेवढा खर्च करावा, आपण इथं मानवतेच्या कार्यासाठीच बसलोय. पण जर जनतेनं त्याची माहिती मागितली तर पंतप्रधानांनी ती द्यावी, अशी जोरदार मागणी मोदींनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2012 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close