S M L

पुण्यातील एम्स हॉस्पिटल वादाच्या भोवर्‍यात

02 ऑक्टोबरएकीकडे पुणे महापालिकेनं शहरातलं बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मोहीम सुरू केली आहे. पण पुण्यातल्या औंध भागात महापालिकेचं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून सुरू करण्यात आलेलं एम्स हॉस्पिटल वादाच्या भोवर्‍यात सापडलं आहे. या हॉस्पिटलचे तीन मजले बेकायदेशीर आहेत असं आता उघड झालं आहे. औंध भागातल्या एम्स हॉस्पिटलला फक्त तीनच मजले बांधण्याची परवानगी असताना इथे सहा मजले चढवण्यात आले. तसेच परवानगी घेताना दोन जिने दाखवण्यात आले. पण प्रत्यक्षात मात्र एकच जिना तयार करण्यात आला. त्यामुळे या बेकायदेशीर हॉस्पिटलवर कारवाई करावी, अशी मागणी होतेय.पण या हॉस्पिटलचं बांधकाम नियमांनुसार असल्याचं पुण्याचे माजी महापौर दत्ता गायकवाड यांच म्हणणं आहे. सर्वसामान्य लोकांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर महापालिका लगेच बुलडोझर चालवून कारवाई करते मग महापालिका स्वत: केलेली बेकायदेशीर बांधकामं का हाणून पाडत नाहीत, असा सवाल सजग नागरिक मंचनं केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 2, 2012 03:35 PM IST

पुण्यातील एम्स हॉस्पिटल वादाच्या भोवर्‍यात

02 ऑक्टोबर

एकीकडे पुणे महापालिकेनं शहरातलं बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मोहीम सुरू केली आहे. पण पुण्यातल्या औंध भागात महापालिकेचं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून सुरू करण्यात आलेलं एम्स हॉस्पिटल वादाच्या भोवर्‍यात सापडलं आहे. या हॉस्पिटलचे तीन मजले बेकायदेशीर आहेत असं आता उघड झालं आहे.

औंध भागातल्या एम्स हॉस्पिटलला फक्त तीनच मजले बांधण्याची परवानगी असताना इथे सहा मजले चढवण्यात आले. तसेच परवानगी घेताना दोन जिने दाखवण्यात आले. पण प्रत्यक्षात मात्र एकच जिना तयार करण्यात आला. त्यामुळे या बेकायदेशीर हॉस्पिटलवर कारवाई करावी, अशी मागणी होतेय.पण या हॉस्पिटलचं बांधकाम नियमांनुसार असल्याचं पुण्याचे माजी महापौर दत्ता गायकवाड यांच म्हणणं आहे.

सर्वसामान्य लोकांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर महापालिका लगेच बुलडोझर चालवून कारवाई करते मग महापालिका स्वत: केलेली बेकायदेशीर बांधकामं का हाणून पाडत नाहीत, असा सवाल सजग नागरिक मंचनं केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2012 03:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close