S M L

आर्थिक सुधारणांच्या दुसर्‍या इनिंगसाठी सरकारची तयारी

04 ऑक्टोबरकेंद्र सरकार आर्थिक सुधारणांचा आपला धडाका सुरूच ठेवण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने आर्थिक सु़थारणांच्या दृष्टीने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. आज होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निवृत्तीवेतन क्षेत्रात 26% तर विमा क्षेत्रात 49% परकीय गुंतवणुकीसाठी परवानगी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या निवृत्तीवेतन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस परवानगी नाहीये तर विमा क्षेत्रात 26% परकीय गुंतवणुकीची मर्यादा आहे. या बैठकीत औषध दरनिश्चिती धोरणासंदर्भातसुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे. अनेक औषथ तज्ञांनी या धोरणात त्रुटी असल्याचा आक्षेप घेतला आहे. या धोरणामुळे औषध दरांसंदर्भात ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळणार असला तरी दीर्घकालीन दृष्टीने हे धोरण फायदेशीर नसल्याचा तज्ञांचा दावा आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने किरकोळ आणि हवाई वाहतूक क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसाठी परवानगी दिली तर माध्यमांमधील परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवली होती. दरम्यान, आर्थिक सुधारणांच्या या चर्चेमुळे शेअर बाजारातही तेजी आली आहे. सेन्सेक्स 19 हजारांवर पोहोचला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2012 10:13 AM IST

आर्थिक सुधारणांच्या दुसर्‍या इनिंगसाठी सरकारची तयारी

04 ऑक्टोबर

केंद्र सरकार आर्थिक सुधारणांचा आपला धडाका सुरूच ठेवण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने आर्थिक सु़थारणांच्या दृष्टीने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. आज होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निवृत्तीवेतन क्षेत्रात 26% तर विमा क्षेत्रात 49% परकीय गुंतवणुकीसाठी परवानगी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या निवृत्तीवेतन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस परवानगी नाहीये तर विमा क्षेत्रात 26% परकीय गुंतवणुकीची मर्यादा आहे.

या बैठकीत औषध दरनिश्चिती धोरणासंदर्भातसुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे. अनेक औषथ तज्ञांनी या धोरणात त्रुटी असल्याचा आक्षेप घेतला आहे. या धोरणामुळे औषध दरांसंदर्भात ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळणार असला तरी दीर्घकालीन दृष्टीने हे धोरण फायदेशीर नसल्याचा तज्ञांचा दावा आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने किरकोळ आणि हवाई वाहतूक क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसाठी परवानगी दिली तर माध्यमांमधील परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवली होती. दरम्यान, आर्थिक सुधारणांच्या या चर्चेमुळे शेअर बाजारातही तेजी आली आहे. सेन्सेक्स 19 हजारांवर पोहोचला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2012 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close