S M L

बीडमध्ये पुन्हा एकदा अवैध गर्भपात प्रकरण उघड

01 ऑक्टोबरसरकारकडून कडक कारवाई सुरू असतनाही बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैधपणे गर्भपात केल्याचा प्रकार उघड झालं आहे. केज इथं डॉ. चंद्रकांत लामतुरे यांनी अवैधपणे एका महिलेचा 20 आठवड्यांचा गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. लामतुरे हे ग्रामीण रुग्णालयात नोकरी करतात. पण आपल्या खासगी हॉस्पिटलमध्ये ते एका महिलेचा बेकायदेशीरपणे गर्भपात करत असल्याचं ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक थोरात यांनी स्टिंग ऑपरेशन करुन उघड केलं. डॉ.लामतुरे यांच्या विरूद्ध मुंबई एम.पी.टी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. डॉ लामतुरे यांनी आपल्या विरूद्ध हे षडयंत्र असल्याचं सांगून आपल्या गर्भपात केंद्राच्या मान्यतेसाठी प्रकिया सुरू असल्याचं म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2012 02:06 PM IST

बीडमध्ये पुन्हा एकदा अवैध गर्भपात प्रकरण उघड

01 ऑक्टोबर

सरकारकडून कडक कारवाई सुरू असतनाही बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैधपणे गर्भपात केल्याचा प्रकार उघड झालं आहे. केज इथं डॉ. चंद्रकांत लामतुरे यांनी अवैधपणे एका महिलेचा 20 आठवड्यांचा गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. लामतुरे हे ग्रामीण रुग्णालयात नोकरी करतात. पण आपल्या खासगी हॉस्पिटलमध्ये ते एका महिलेचा बेकायदेशीरपणे गर्भपात करत असल्याचं ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक थोरात यांनी स्टिंग ऑपरेशन करुन उघड केलं. डॉ.लामतुरे यांच्या विरूद्ध मुंबई एम.पी.टी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. डॉ लामतुरे यांनी आपल्या विरूद्ध हे षडयंत्र असल्याचं सांगून आपल्या गर्भपात केंद्राच्या मान्यतेसाठी प्रकिया सुरू असल्याचं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2012 02:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close