S M L

रत्नागिरीत खाण परवाना नुतनीकरणावर स्थगिती

04 ऑक्टोबररत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातल्या जांभादगडाच्या खाणींच्या परवान्यांचं नुतनीकरण करायला जिल्हा प्रशासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातल्या खाणमालकांना आपल्या खाणी आता बंद ठेवाव्या लागणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार कोणत्याही प्रकारच्या खनिज उत्खननाला आता केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाचा नाहरकत दाखला आवश्यक आहे. तसे आदेश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सर्व राज्यांना कळवल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खाणींना आता पर्यावरण दाखला मिळवावा लागणार आहे. मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खाणमालकांकडून अशा प्रकारचे पर्यावरण दाखल्याचे प्रस्तावच प्रशासनाकडून स्वीकारले जाणार नसल्याचं खाणमालकांना कळवण्यात आलंय. गाडगीळ समितीने सादर केलेल्या पश्चिम घाट अहवालानुसार या दोन्ही जिल्ह्यात सध्या कोणत्याही प्रकारच्या खाणविषयक परवान्यांना आणि नुतनीकरणाला 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती असल्यामुळे खाणमालकांकडून हे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. तर दुसरीकडे पर्यावरण नाहरकत दाखला म्हणजे नेमकं काय याची माहिती ही जिल्ह्याच्या खनिकर्म विभागाकडून आपल्याला देण्यात आली नसल्याचं खाणमालक सांगत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2012 10:36 AM IST

रत्नागिरीत खाण परवाना नुतनीकरणावर स्थगिती

04 ऑक्टोबर

रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातल्या जांभादगडाच्या खाणींच्या परवान्यांचं नुतनीकरण करायला जिल्हा प्रशासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातल्या खाणमालकांना आपल्या खाणी आता बंद ठेवाव्या लागणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार कोणत्याही प्रकारच्या खनिज उत्खननाला आता केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाचा नाहरकत दाखला आवश्यक आहे. तसे आदेश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सर्व राज्यांना कळवल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खाणींना आता पर्यावरण दाखला मिळवावा लागणार आहे. मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खाणमालकांकडून अशा प्रकारचे पर्यावरण दाखल्याचे प्रस्तावच प्रशासनाकडून स्वीकारले जाणार नसल्याचं खाणमालकांना कळवण्यात आलंय. गाडगीळ समितीने सादर केलेल्या पश्चिम घाट अहवालानुसार या दोन्ही जिल्ह्यात सध्या कोणत्याही प्रकारच्या खाणविषयक परवान्यांना आणि नुतनीकरणाला 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती असल्यामुळे खाणमालकांकडून हे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. तर दुसरीकडे पर्यावरण नाहरकत दाखला म्हणजे नेमकं काय याची माहिती ही जिल्ह्याच्या खनिकर्म विभागाकडून आपल्याला देण्यात आली नसल्याचं खाणमालक सांगत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2012 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close