S M L

गुजरातमध्ये 13,17 डिसेंबरला मतदान

03 ऑक्टोबरगुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडणुकाचे बिगुल वाजले आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर हिमाचलप्रदेशमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान 13 डिसेंबरला तर दुसर्‍या टप्प्याचं मतदान 17 डिसेंबरला होणार आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये 4 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या दोन्ही ठिकाणची मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे. नरेंद्र मोदींना स्वतःला राष्ट्रीय पातळीवरचा पक्षाचा नेता म्हणून सिद्ध करण्यासाठी या निवडणुकीत अधिकाधिक जागा निवडून आणाव्या लागतील. तर शंकरसिंघ वाघेला यांच्यावर काँग्रेसची भिस्त आहे. तसेच केशुभाई पटेल यांनी काढलेल्या गुजरात नवनिर्माण पक्षाचं आव्हान नरेंद्र मोदी यांना असणार आहे. शिवाय भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि जनता दल संयुक्तनं गुजरातची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याने मोदींपुढे एक वेगळीच अडचण असणार आहे. तर तिकडे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला मात्र सत्ता टिकवण्यासाठी झगडावं लागणार आहे. गुजरात विधानसभेचं सध्याचं चित्रएकूण जागा - 182* भाजप - 117* काँग्रेस - 59* इतर - 06हिमाचल प्रदेशएकूण जागा - 68* भाजप - 42* काँग्रेस - 23* इतर - 03गुजरातमध्ये महत्वाचे मुद्दे * या निवडणुकीत जातीयवाद हा प्रमुख मुद्दा नाही* जातीयवादाच्या मुद्यावर दोन्हीही प्रमुख पक्ष निवडणूक लढवू इच्छित नाही* मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेची काँग्रेसला भीती* मोदींना विकास पुरुष अशी स्वतःची प्रतिमा बनवायची आहे* निवारा, पाणी आणि महागाई हे प्रमुख मुद्दे असणार* सरदार सरोवर धरणाच्या कालव्याच्या कामातली दिरंगाई हा सौराष्ट्र, कच्छ आणि उत्तर गुजरातमधला प्रमुख मुद्दा* भूसंपादन हा सुद्धा निवडणुकातला महत्वाचा विषय, यावरून जनतेत असंतोष* भूसंपादन करून खाजगी उद्योगांना विकल्याचं प्रकरण मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं करतंगुजरात निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदींची प्रतिमा आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेची परीक्षा मानली जातेय. या निवडणुकीत मोदींसमोर सध्या कोणती आव्हानं आहेत ते पाहूया...काय होणार गुजरातमध्ये ?तिसर्‍या टर्ममध्ये सरकारिवरोधी लाटेला मोदी कसे सामोरे जाणार ?सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरुद्ध मोदींनी चालवलेल्या मोहिमेला यश येईल का ? बनावट एन्काऊंटर प्रकरणातल्या सीबीआयच्या आरोपपत्राचा निवडणुकीवर परिणाम होईल का ?गुजरातमधला दुष्काळ मतदानावर परिणाम घडवेल का ? मतदारसंघ फेररचनेचा मतदानावर परिणाम होईल का ?केशुभाई फॅक्टर भाजपला अडथळा ठरेल का? हिमाचलच्या विधानसभा निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे असतील, त्यावर एक नजर टाकूया...- पंजाब आणि हरियाणाप्रमाणं इथंही सत्ताधारी पुन्हा निवडून येत नाहीत- कोलगेटच्या मुद्यामुळं कदाचित मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचा भ्रष्टाचार बाजूला पडण्याची शक्यता- मुलाला दिलेल्या भूखंडाचा मुद्दा गाजण्याची शक्यता- सफरचंद उत्पादक रिटेल एफडीआयच्या बाजूने- सेझसाठी भूसंपादन केलं, मात्र मोबदला दिला नाही- डिझेल दरवाढही कळीचा मुद्दा

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 3, 2012 11:23 AM IST

गुजरातमध्ये 13,17 डिसेंबरला मतदान

03 ऑक्टोबर

गुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडणुकाचे बिगुल वाजले आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर हिमाचलप्रदेशमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान 13 डिसेंबरला तर दुसर्‍या टप्प्याचं मतदान 17 डिसेंबरला होणार आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये 4 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या दोन्ही ठिकाणची मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे. नरेंद्र मोदींना स्वतःला राष्ट्रीय पातळीवरचा पक्षाचा नेता म्हणून सिद्ध करण्यासाठी या निवडणुकीत अधिकाधिक जागा निवडून आणाव्या लागतील. तर शंकरसिंघ वाघेला यांच्यावर काँग्रेसची भिस्त आहे. तसेच केशुभाई पटेल यांनी काढलेल्या गुजरात नवनिर्माण पक्षाचं आव्हान नरेंद्र मोदी यांना असणार आहे. शिवाय भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि जनता दल संयुक्तनं गुजरातची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याने मोदींपुढे एक वेगळीच अडचण असणार आहे. तर तिकडे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला मात्र सत्ता टिकवण्यासाठी झगडावं लागणार आहे. गुजरात विधानसभेचं सध्याचं चित्र

एकूण जागा - 182* भाजप - 117* काँग्रेस - 59* इतर - 06हिमाचल प्रदेशएकूण जागा - 68* भाजप - 42* काँग्रेस - 23* इतर - 03

गुजरातमध्ये महत्वाचे मुद्दे * या निवडणुकीत जातीयवाद हा प्रमुख मुद्दा नाही* जातीयवादाच्या मुद्यावर दोन्हीही प्रमुख पक्ष निवडणूक लढवू इच्छित नाही* मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेची काँग्रेसला भीती* मोदींना विकास पुरुष अशी स्वतःची प्रतिमा बनवायची आहे* निवारा, पाणी आणि महागाई हे प्रमुख मुद्दे असणार* सरदार सरोवर धरणाच्या कालव्याच्या कामातली दिरंगाई हा सौराष्ट्र, कच्छ आणि उत्तर गुजरातमधला प्रमुख मुद्दा* भूसंपादन हा सुद्धा निवडणुकातला महत्वाचा विषय, यावरून जनतेत असंतोष* भूसंपादन करून खाजगी उद्योगांना विकल्याचं प्रकरण मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं करतं

गुजरात निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदींची प्रतिमा आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेची परीक्षा मानली जातेय. या निवडणुकीत मोदींसमोर सध्या कोणती आव्हानं आहेत ते पाहूया...

काय होणार गुजरातमध्ये ?तिसर्‍या टर्ममध्ये सरकारिवरोधी लाटेला मोदी कसे सामोरे जाणार ?सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरुद्ध मोदींनी चालवलेल्या मोहिमेला यश येईल का ? बनावट एन्काऊंटर प्रकरणातल्या सीबीआयच्या आरोपपत्राचा निवडणुकीवर परिणाम होईल का ?गुजरातमधला दुष्काळ मतदानावर परिणाम घडवेल का ? मतदारसंघ फेररचनेचा मतदानावर परिणाम होईल का ?केशुभाई फॅक्टर भाजपला अडथळा ठरेल का?

हिमाचलच्या विधानसभा निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे असतील, त्यावर एक नजर टाकूया...- पंजाब आणि हरियाणाप्रमाणं इथंही सत्ताधारी पुन्हा निवडून येत नाहीत- कोलगेटच्या मुद्यामुळं कदाचित मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचा भ्रष्टाचार बाजूला पडण्याची शक्यता- मुलाला दिलेल्या भूखंडाचा मुद्दा गाजण्याची शक्यता- सफरचंद उत्पादक रिटेल एफडीआयच्या बाजूने- सेझसाठी भूसंपादन केलं, मात्र मोबदला दिला नाही- डिझेल दरवाढही कळीचा मुद्दा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2012 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close