S M L

निकृष्ट काम करुनही भांगडियांना मिळाले 500 कोटींचे कंत्राट

प्रशांत कोरटकरसह आशिष जाधव, मुंबई 03 ऑक्टोबरबहुचर्चित गोसीखुर्द प्रकल्प डाव्या कालव्याच्या निकृष्ट बांधकामामुळे अडचणीत आला आहे. डाव्या कालव्याचे मुख्य ठेकेदार आहेत भाजपचे आमदार मितेश भांगडिया. भांगडिया आणि त्यांच्या इतर सहकारी ठेकेदारांनी गोसीखुर्दच नाही तर विदर्भातल्या अनेक सिंचन योजनांमध्ये घोळ केला आहे. या प्रकरणांचा पर्दाफाश करणारा हा स्पशेल रिपोर्ट.गेल्या एप्रिल महिन्यात विधान परिषदेवर निवडून गेलेले हे आमदार आहेत बडे ठेकेदार मितेश भांगडिया. 10-12 वर्षांपूर्वी साधे सर्व्हे कॉन्ट्रॅक्टर असलेले मितेश भांगडिया आज भाजपचे आमदार बनलेत पण मितेश भांगडिया आणि इतर ठेकेदारांच्या करणीमुळे राज्यातला एकमेव राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेला गोसीखुर्द प्रकल्प बंद पडलाय. असं काय केलंय मितेश भांगडिया आणि इतर ठेकेदारांनी की, गोसीखुर्द प्रकल्पाचं बांधकाम ठप्प झालंय. गेल्या सात महिन्यांपासून केंद्र सरकारनं प्रकल्पाचा निधी अडवून धरलाय. तसेच या प्रकल्पावर सीबीआय चौकशीची टांगती तलवार लटकतेय.अडीच वर्षांपूर्वी मितेश भांगडिया आणि हैदराबादचे ठेकेदार के. रामाराव यांच्या कंपन्यांनी गोसीखुर्द प्रकल्पाचा 23 किलोमीटरचा डावा कालवा बांधला. पण सध्या हा संपूर्ण डावा कालवा तोडला जातोय. या कालव्याचा निम्मा भाग म्हणजे 12 किलोमीटरचा पट्टा मितेश भांगडियांच्या कंपनीने बांधला. पण निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानं कालव्याला तडे गेले. त्यामुळे या कालव्याची मार्च 2010 मध्ये मेंढेगिरी समितीनं चौकशी केली. त्यात काँक्रिट लायनिंग चुकल्यानं कालवा पुन्हा बांधण्यात यावा, अशी शिफारस करण्यात आली. त्यानुसार अडीच वर्षांपूर्वी राज्य सरकारने ठेकेदारांना स्वत: च्या खर्चातून संपूर्ण कालवा तोडून नव्याने बांधण्याचे आदेश दिले.2007 मध्ये डाव्या कालव्याचं 20 कोटी 24 लाख रुपयांचं काम मितेश भांडगिया यांच्या एम. जी. भांगडिया कंपनीला मिळालं. जे आज पूर्णपणे वाया गेलंय. तसेच गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत असलेल्या घोडाझरी शाखा कालवा 98 कोटी 55 लाख रुपये, मोखाबर्डी उपसा सिंचनाचे 100 कोटी 38 लाख रुपये, अड्याळ शाखा कालव्याचे 8 कोटी 75 लाख रुपये, नौताळा मेटेपार-चिखलपार शाखा कालव्याचे 241 कोटी 61 लाख रुपये आणि नेरळा उपसा सिंचन योजनेचे 43 कोटी 16 लाख रुपयांचं काम मितेश भांगडिया आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या कंपन्यांना देण्यात आलंय. याचाच अर्थ विदर्भात मितेश भांगडियांच्या कंपन्यांना ज्वाईंट व्हेन्चरच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांहून अधिकची कामं मिळाली. मुख्य डावा कालव्याच्या कामाबाबत बोलायचे तर अडीच वर्ष झाली तरीसुद्धा हा कालवा तोडण्याचंच काम चाललंय. त्यामुळे नव्याने कालवा बांधण्याच्या कामाला मितेश भांगडियांच्या कंपनीने गतीच दिलेली नाही, असा ठपका केंद्रीय जल आयोगाने ठेवला आहे. पण आपण काही केलंच नाही असा आव मितेश भांगडिया आणत आहे. मी काही केलं नाही. वाटलं तर सीबीआय चौकशी करा किंवा नार्को टेस्ट करा असं मितेश भांगडिया म्हणता.मितेश भांगडियांच्या कंपनी बॅलन्स शिटनुसार, 2003 मध्ये केवळ 23 लाख 68 हजार रुपयांची उलाढाल करणार्‍या भांगडियांच्या कंपनीला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची पाचशे कोटी रुपयांची कामं कशी मिळतात हे एक कोडंच आहे. त्यामुळेच की काय गोसीखुर्दच्या घोटाळ्यात आपली एम. जी. भांगडिया कंपनी ब्लॅक लिस्टेड होईल, या भीतीपोटी मितेश भांगडियांनी कंपनीचं नाव आता एम. के. एस. कन्स्ट्रक्शन व्हेंचर असं बदलून घेतलंय हेही उघडकीला आलंय. भांगडियांचं गौडबंगाल2007 - गोसीखुर्दच्या डाव्या कालव्याचं काम - 20 कोटी 24 लाख रु.मितेश भांगडियांच्या एम. जी. भांगडिया कंपनीला दिलं कामघोडाझरी शाखा कालवा - 98 कोटी 55 लाख रु. मोखाबर्डी उपसा सिंचन - 100 कोटी 38 लाख रु. अड्याळ शाखा कालवा - 8 कोटी 75 लाख रु.नौताळा मेटेपार- चिखलपार शाखा कालवा - 241 कोटी 61 लाख रु.नेरळा उपसा सिंचन योजना - 43 कोटी 16 लाख रु.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 3, 2012 12:26 PM IST

निकृष्ट काम करुनही भांगडियांना मिळाले 500 कोटींचे कंत्राट

प्रशांत कोरटकरसह आशिष जाधव, मुंबई

03 ऑक्टोबर

बहुचर्चित गोसीखुर्द प्रकल्प डाव्या कालव्याच्या निकृष्ट बांधकामामुळे अडचणीत आला आहे. डाव्या कालव्याचे मुख्य ठेकेदार आहेत भाजपचे आमदार मितेश भांगडिया. भांगडिया आणि त्यांच्या इतर सहकारी ठेकेदारांनी गोसीखुर्दच नाही तर विदर्भातल्या अनेक सिंचन योजनांमध्ये घोळ केला आहे. या प्रकरणांचा पर्दाफाश करणारा हा स्पशेल रिपोर्ट.

गेल्या एप्रिल महिन्यात विधान परिषदेवर निवडून गेलेले हे आमदार आहेत बडे ठेकेदार मितेश भांगडिया. 10-12 वर्षांपूर्वी साधे सर्व्हे कॉन्ट्रॅक्टर असलेले मितेश भांगडिया आज भाजपचे आमदार बनलेत पण मितेश भांगडिया आणि इतर ठेकेदारांच्या करणीमुळे राज्यातला एकमेव राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेला गोसीखुर्द प्रकल्प बंद पडलाय.

असं काय केलंय मितेश भांगडिया आणि इतर ठेकेदारांनी की, गोसीखुर्द प्रकल्पाचं बांधकाम ठप्प झालंय. गेल्या सात महिन्यांपासून केंद्र सरकारनं प्रकल्पाचा निधी अडवून धरलाय. तसेच या प्रकल्पावर सीबीआय चौकशीची टांगती तलवार लटकतेय.

अडीच वर्षांपूर्वी मितेश भांगडिया आणि हैदराबादचे ठेकेदार के. रामाराव यांच्या कंपन्यांनी गोसीखुर्द प्रकल्पाचा 23 किलोमीटरचा डावा कालवा बांधला. पण सध्या हा संपूर्ण डावा कालवा तोडला जातोय. या कालव्याचा निम्मा भाग म्हणजे 12 किलोमीटरचा पट्टा मितेश भांगडियांच्या कंपनीने बांधला. पण निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानं कालव्याला तडे गेले. त्यामुळे या कालव्याची मार्च 2010 मध्ये मेंढेगिरी समितीनं चौकशी केली. त्यात काँक्रिट लायनिंग चुकल्यानं कालवा पुन्हा बांधण्यात यावा, अशी शिफारस करण्यात आली. त्यानुसार अडीच वर्षांपूर्वी राज्य सरकारने ठेकेदारांना स्वत: च्या खर्चातून संपूर्ण कालवा तोडून नव्याने बांधण्याचे आदेश दिले.

2007 मध्ये डाव्या कालव्याचं 20 कोटी 24 लाख रुपयांचं काम मितेश भांडगिया यांच्या एम. जी. भांगडिया कंपनीला मिळालं. जे आज पूर्णपणे वाया गेलंय. तसेच गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत असलेल्या घोडाझरी शाखा कालवा 98 कोटी 55 लाख रुपये, मोखाबर्डी उपसा सिंचनाचे 100 कोटी 38 लाख रुपये, अड्याळ शाखा कालव्याचे 8 कोटी 75 लाख रुपये, नौताळा मेटेपार-चिखलपार शाखा कालव्याचे 241 कोटी 61 लाख रुपये आणि नेरळा उपसा सिंचन योजनेचे 43 कोटी 16 लाख रुपयांचं काम मितेश भांगडिया आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या कंपन्यांना देण्यात आलंय. याचाच अर्थ विदर्भात मितेश भांगडियांच्या कंपन्यांना ज्वाईंट व्हेन्चरच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांहून अधिकची कामं मिळाली.

मुख्य डावा कालव्याच्या कामाबाबत बोलायचे तर अडीच वर्ष झाली तरीसुद्धा हा कालवा तोडण्याचंच काम चाललंय. त्यामुळे नव्याने कालवा बांधण्याच्या कामाला मितेश भांगडियांच्या कंपनीने गतीच दिलेली नाही, असा ठपका केंद्रीय जल आयोगाने ठेवला आहे. पण आपण काही केलंच नाही असा आव मितेश भांगडिया आणत आहे.

मी काही केलं नाही. वाटलं तर सीबीआय चौकशी करा किंवा नार्को टेस्ट करा असं मितेश भांगडिया म्हणता.मितेश भांगडियांच्या कंपनी बॅलन्स शिटनुसार, 2003 मध्ये केवळ 23 लाख 68 हजार रुपयांची उलाढाल करणार्‍या भांगडियांच्या कंपनीला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची पाचशे कोटी रुपयांची कामं कशी मिळतात हे एक कोडंच आहे. त्यामुळेच की काय गोसीखुर्दच्या घोटाळ्यात आपली एम. जी. भांगडिया कंपनी ब्लॅक लिस्टेड होईल, या भीतीपोटी मितेश भांगडियांनी कंपनीचं नाव आता एम. के. एस. कन्स्ट्रक्शन व्हेंचर असं बदलून घेतलंय हेही उघडकीला आलंय. भांगडियांचं गौडबंगाल2007 - गोसीखुर्दच्या डाव्या कालव्याचं काम - 20 कोटी 24 लाख रु.मितेश भांगडियांच्या एम. जी. भांगडिया कंपनीला दिलं कामघोडाझरी शाखा कालवा - 98 कोटी 55 लाख रु. मोखाबर्डी उपसा सिंचन - 100 कोटी 38 लाख रु. अड्याळ शाखा कालवा - 8 कोटी 75 लाख रु.नौताळा मेटेपार- चिखलपार शाखा कालवा - 241 कोटी 61 लाख रु.नेरळा उपसा सिंचन योजना - 43 कोटी 16 लाख रु.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2012 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close