S M L

सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

03 ऑक्टोबरगुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधींनी आज राजकोटमध्ये निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. आपल्या पहिल्याचं भाषणात सोनिया गांधींनी नाव न घेता मोदी सरकारवर हल्लाबोल केला. विरोधकांना प्रगती दिसत नाही ते फक्त टीका करतात. विरोधक निराधार आरोप करून मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. गुजरात सरकार शेतकर्‍यांना मदत करण्यात अपयशी ठरलं गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत असा आरोपही सोनिया गांधींनी केला.एकीकडे नरेंद्र मोदींनी सोनिया गांधींवर वैयक्तिक हल्ला सुरू ठेवला असताना सोनियांनी मात्र त्याच भाषेत उत्तर देणं टाळलं.गुजरात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या दिवशीच राजकोटमध्ये घेतलेल्या सभेत सोनियांनी विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केलं. आणि निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती काय असणार याची चुणूक दाखवली.सोनिया गांधींच्या परदेशातल्या उपचारासाठी 1880 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च झाले. असा सनसनाटी आरोप करून नरेंद्र मोदींनी गुजरातच्या प्रचाराची दिशाच बदलली. बुधवारी सोनिया गांधी राजकोटमध्ये दाखल झाल्या, तेव्हा त्या मोदींना थेट उत्तर देतील अशी अपेक्षा होती. पण मोदींच्या सापळ्यात न अडकता. सोनियांनी पुन्हा एकदा प्रचाराचा फोकस मोदींच्या प्रशासनावर आणला. सोनियांनी बोलण्याचं टाळलं असलं तरी, मुख्य माहिती आयुक्तांनी मात्र स्पष्ट केलंय की, सोनियांनी उपचारासाठी सरकारी निधीचा वापर नाही केला. गेल्या दोन निवडणुकांपासून धडा घेत काँग्रेसनं यावेळी मोदींवर वैयक्तिक हल्ला न करता त्यांच्या विकासाच्या दाव्याला टारगेट करण्याची रणनीती आखलीय. म्हणूनच शेतकर्‍यांच्या समस्या जिथे सगळ्यांत जास्त आहेत. त्या राजकोटची निवड सोनियांच्या सभेसाठी करण्यात आली. सौराष्ट्राचं मुख्य केंद्र असलेल्या राजकोटमध्ये मोदी विरोधकांची संख्याही जास्त आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला गमावण्यासारखं फारसं नाही. पण मोदींसाठी मात्र ही निवडणूक करो या मरोची आहे. मोदींची राष्ट्रीय राजकारणातली एंट्री या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. म्हणूनच.. काँग्रेससोबत.. सार्‍या देशाचं लक्ष या निवडणुकीवर लागलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 3, 2012 12:39 PM IST

सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

03 ऑक्टोबर

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधींनी आज राजकोटमध्ये निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. आपल्या पहिल्याचं भाषणात सोनिया गांधींनी नाव न घेता मोदी सरकारवर हल्लाबोल केला. विरोधकांना प्रगती दिसत नाही ते फक्त टीका करतात. विरोधक निराधार आरोप करून मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. गुजरात सरकार शेतकर्‍यांना मदत करण्यात अपयशी ठरलं गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत असा आरोपही सोनिया गांधींनी केला.

एकीकडे नरेंद्र मोदींनी सोनिया गांधींवर वैयक्तिक हल्ला सुरू ठेवला असताना सोनियांनी मात्र त्याच भाषेत उत्तर देणं टाळलं.गुजरात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या दिवशीच राजकोटमध्ये घेतलेल्या सभेत सोनियांनी विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केलं. आणि निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती काय असणार याची चुणूक दाखवली.

सोनिया गांधींच्या परदेशातल्या उपचारासाठी 1880 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च झाले. असा सनसनाटी आरोप करून नरेंद्र मोदींनी गुजरातच्या प्रचाराची दिशाच बदलली. बुधवारी सोनिया गांधी राजकोटमध्ये दाखल झाल्या, तेव्हा त्या मोदींना थेट उत्तर देतील अशी अपेक्षा होती. पण मोदींच्या सापळ्यात न अडकता. सोनियांनी पुन्हा एकदा प्रचाराचा फोकस मोदींच्या प्रशासनावर आणला. सोनियांनी बोलण्याचं टाळलं असलं तरी, मुख्य माहिती आयुक्तांनी मात्र स्पष्ट केलंय की, सोनियांनी उपचारासाठी सरकारी निधीचा वापर नाही केला. गेल्या दोन निवडणुकांपासून धडा घेत काँग्रेसनं यावेळी मोदींवर वैयक्तिक हल्ला न करता त्यांच्या विकासाच्या दाव्याला टारगेट करण्याची रणनीती आखलीय. म्हणूनच शेतकर्‍यांच्या समस्या जिथे सगळ्यांत जास्त आहेत. त्या राजकोटची निवड सोनियांच्या सभेसाठी करण्यात आली. सौराष्ट्राचं मुख्य केंद्र असलेल्या राजकोटमध्ये मोदी विरोधकांची संख्याही जास्त आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला गमावण्यासारखं फारसं नाही. पण मोदींसाठी मात्र ही निवडणूक करो या मरोची आहे. मोदींची राष्ट्रीय राजकारणातली एंट्री या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. म्हणूनच.. काँग्रेससोबत.. सार्‍या देशाचं लक्ष या निवडणुकीवर लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2012 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close