S M L

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अजितदादांनी मारली दांडी

आशिष जाधव, बडोदे10 ऑक्टोबरराष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन आज बडोद्यात पार पडलं. या अधिवेशनात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी देशात मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात आणि गुजरात विधानसभेत आघाडी करायची असेल तर काँग्रेसनं राष्ट्रवादीला गृहित धरू नये अशी हूल काँग्रेसला दिली. पण या अधिवेशनात मुद्दा गाजला तो अजित दादांच्या अनुपस्थितीचा.. बडोद्याच्या राष्ट्रीय अधिवेशनात गैरहजर राहून अजित पवारांनी पवारांना घरचा अहेर दिला. अजित पवारांच्या गैरहजेरीमुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन निरस ठरलं. राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन आज बडोद्यात सुरू झालं. पण उपमुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेले अजित पवार गैरहजर राहिल्यामुळे तिथे नव्याच चर्चेला तोंड फुटलंय. या अधिवेशनात शरद पवारांची पक्षाध्यक्षपदी फेरनिवड करण्याची औपचारिकताही पार पाडण्यात आली.हो नाही म्हणता म्हणता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनाला बडोद्यात सुरुवात झाली. पी.ए.संगमा गेल्यानंतर झालेल्या पहिल्याच अधिवेशनात.. गुजरात विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा होणार होती. पण राजीनामा देऊन तर्कवितर्कांना जन्म देणारे अजित पवार गैरहजर राहिल्याने.. भलत्याच चर्चेला सुरुवात झाली. अजित पवार नाराज नाहीयेत ते आजारी आहेत असं सांगत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना सारवासारव करावी लागली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला अजित पवार का गैरहजर राहिले, कसे गैरहजर राहिले हीच चर्चा उपस्थित नेत्यांमध्ये रंगली होती. पण प्रत्यक्षात असं काही घडणार आहे याची कुणकुण आधीच शरद पवारांना लागली होती. त्यामुळे बडोद्यामध्ये शरद पवारांनी लेकीबरोबरचं नवं पोस्टर ठिकठिकाणी लावून घेतलं. आपली वारसदार सुप्रिया सुळेच आहे, असा संदेशही राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला गेला.विशेष म्हणजे अजित पवारांच्याच गैरहजेरीत या अधिवेशनात सुप्रिया सुळेंच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसला पक्षाने अधिकृत मान्यता दिली. तसंच, शरद पवारांची सलग पाचव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2012 04:24 PM IST

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अजितदादांनी मारली दांडी

आशिष जाधव, बडोदे

10 ऑक्टोबर

राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन आज बडोद्यात पार पडलं. या अधिवेशनात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी देशात मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात आणि गुजरात विधानसभेत आघाडी करायची असेल तर काँग्रेसनं राष्ट्रवादीला गृहित धरू नये अशी हूल काँग्रेसला दिली. पण या अधिवेशनात मुद्दा गाजला तो अजित दादांच्या अनुपस्थितीचा.. बडोद्याच्या राष्ट्रीय अधिवेशनात गैरहजर राहून अजित पवारांनी पवारांना घरचा अहेर दिला. अजित पवारांच्या गैरहजेरीमुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन निरस ठरलं.

राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन आज बडोद्यात सुरू झालं. पण उपमुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेले अजित पवार गैरहजर राहिल्यामुळे तिथे नव्याच चर्चेला तोंड फुटलंय. या अधिवेशनात शरद पवारांची पक्षाध्यक्षपदी फेरनिवड करण्याची औपचारिकताही पार पाडण्यात आली.

हो नाही म्हणता म्हणता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनाला बडोद्यात सुरुवात झाली. पी.ए.संगमा गेल्यानंतर झालेल्या पहिल्याच अधिवेशनात.. गुजरात विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा होणार होती. पण राजीनामा देऊन तर्कवितर्कांना जन्म देणारे अजित पवार गैरहजर राहिल्याने.. भलत्याच चर्चेला सुरुवात झाली. अजित पवार नाराज नाहीयेत ते आजारी आहेत असं सांगत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना सारवासारव करावी लागली.

पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला अजित पवार का गैरहजर राहिले, कसे गैरहजर राहिले हीच चर्चा उपस्थित नेत्यांमध्ये रंगली होती. पण प्रत्यक्षात असं काही घडणार आहे याची कुणकुण आधीच शरद पवारांना लागली होती. त्यामुळे बडोद्यामध्ये शरद पवारांनी लेकीबरोबरचं नवं पोस्टर ठिकठिकाणी लावून घेतलं. आपली वारसदार सुप्रिया सुळेच आहे, असा संदेशही राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला गेला.

विशेष म्हणजे अजित पवारांच्याच गैरहजेरीत या अधिवेशनात सुप्रिया सुळेंच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसला पक्षाने अधिकृत मान्यता दिली. तसंच, शरद पवारांची सलग पाचव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2012 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close