S M L

भुजबळांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल

12 ऑक्टोबरसार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा आमदार पंकज भुजबळ आणि पुतण्या खासदार समीर भुजबळ यांच्या कंपन्यांनी केलेले जमिनीचे व्यवहार कालच आयबीएन लोकमतने दाखवले होते. हे प्रकरण आता मुंबई हायकोर्टातही दाखल झालंय. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पदाचा गैरवापर करत बेहिशेबी मालमत्ता जमवली असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे. नवी मुंबईतल्या खारघरमधली जमीन खरेदी आणि सहयोगी कंपन्यांसोबतचे पैशांचे संशयास्पद व्यवहारच नाही तर भुजबळ कुटुंबीयांविरोधात इतरही अनेक आरोप या याचिकेत करण्यात आले आहे. समीर आणि पंकज भुजबळ यांनी बेनामी कंपन्या स्थापन केल्या स्वत:च्या कंपन्यांमधून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केली. परदेशात कोळशाच्या खाणींमध्ये गुंतवणूक केली, अस्तित्वात नसलेल्या पत्त्यांवर कंपन्यांचे व्यवहार दाखवले असे अनेक आरोप यामध्ये करण्यात आले आहे. या सर्व आरोपांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. इतकचं नाही तर, डिसप्रपोर्शनेट ऍसेट्स ऍण्ड प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, रिप्रेझेंटेशन ऑफ पिपल्स ऍक्ट या कायद्यांतर्गत या तिघांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.भुजबळांचा सिक्रेट प्रकल्प- नवी मुंबईत खारघरच्या सेक्टर 36 मध्ये सुरू आहे बांधकाम- शिवयश आणि ब्लू सर्कल इन्फ्राटेक कंपन्यांनी भुजबळांच्या कंपन्यांत अर्ध्या तासात फिरवले 34.48 कोटी रुपये- समीर आणि पंकज संचालक असलेल्या देविशा कंपनीचं बांधकाम- समीर आणि पंकज संचालक असलेल्या परवेश कंपनीच्या माध्यमातूनही झाले व्यवहार- 'हेक्स वर्ल्ड प्रॉजेक्ट' (HEX) नावानं सुरू आहे बांधकामंआयबीएन लोकमतचे सवाल- हा प्रकल्प नेमका आहे काय ?- 100 एकर नसेल तर किती एकरवर बांधकाम सुरु आहे ?- अक्षय अरोरा हे शिवयश आणि ब्लू सर्कल कंपनीमध्ये संचालक आहेत,त्यांच्या मालकीचे घोडे आहेत असा दावा काल भुजबळांच्या एका सहकार्‍याने आयबीएन लोकमतला दिलेल्या माहितीत केला. हे अरोरा आणि समीर-पंकज यांचे व्यावसायिक संबंध नेमके काय आहेत ?- समीर भुजबळ तुमची 2009 मध्ये स्थावर जंगम मालमत्ता किती होती ? आता किती आहे ? एकूण किती कंपन्या तुम्ही चालवता ? त्या कंपन्यांच्या मालकीची किती जमीन आहे? तुमच्या कंपन्यांचा टर्नओव्हर किती आहे ?- हेक्स प्रकल्प संपूर्ण कायदेशीर असल्याचा तुमचा दावा आहे का ?

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2012 04:36 PM IST

भुजबळांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल

12 ऑक्टोबर

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा आमदार पंकज भुजबळ आणि पुतण्या खासदार समीर भुजबळ यांच्या कंपन्यांनी केलेले जमिनीचे व्यवहार कालच आयबीएन लोकमतने दाखवले होते. हे प्रकरण आता मुंबई हायकोर्टातही दाखल झालंय. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पदाचा गैरवापर करत बेहिशेबी मालमत्ता जमवली असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे. नवी मुंबईतल्या खारघरमधली जमीन खरेदी आणि सहयोगी कंपन्यांसोबतचे पैशांचे संशयास्पद व्यवहारच नाही तर भुजबळ कुटुंबीयांविरोधात इतरही अनेक आरोप या याचिकेत करण्यात आले आहे. समीर आणि पंकज भुजबळ यांनी बेनामी कंपन्या स्थापन केल्या स्वत:च्या कंपन्यांमधून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केली. परदेशात कोळशाच्या खाणींमध्ये गुंतवणूक केली, अस्तित्वात नसलेल्या पत्त्यांवर कंपन्यांचे व्यवहार दाखवले असे अनेक आरोप यामध्ये करण्यात आले आहे. या सर्व आरोपांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. इतकचं नाही तर, डिसप्रपोर्शनेट ऍसेट्स ऍण्ड प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, रिप्रेझेंटेशन ऑफ पिपल्स ऍक्ट या कायद्यांतर्गत या तिघांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.भुजबळांचा सिक्रेट प्रकल्प

- नवी मुंबईत खारघरच्या सेक्टर 36 मध्ये सुरू आहे बांधकाम- शिवयश आणि ब्लू सर्कल इन्फ्राटेक कंपन्यांनी भुजबळांच्या कंपन्यांत अर्ध्या तासात फिरवले 34.48 कोटी रुपये- समीर आणि पंकज संचालक असलेल्या देविशा कंपनीचं बांधकाम- समीर आणि पंकज संचालक असलेल्या परवेश कंपनीच्या माध्यमातूनही झाले व्यवहार- 'हेक्स वर्ल्ड प्रॉजेक्ट' (HEX) नावानं सुरू आहे बांधकामं

आयबीएन लोकमतचे सवाल- हा प्रकल्प नेमका आहे काय ?- 100 एकर नसेल तर किती एकरवर बांधकाम सुरु आहे ?- अक्षय अरोरा हे शिवयश आणि ब्लू सर्कल कंपनीमध्ये संचालक आहेत,त्यांच्या मालकीचे घोडे आहेत असा दावा काल भुजबळांच्या एका सहकार्‍याने आयबीएन लोकमतला दिलेल्या माहितीत केला. हे अरोरा आणि समीर-पंकज यांचे व्यावसायिक संबंध नेमके काय आहेत ?- समीर भुजबळ तुमची 2009 मध्ये स्थावर जंगम मालमत्ता किती होती ? आता किती आहे ? एकूण किती कंपन्या तुम्ही चालवता ? त्या कंपन्यांच्या मालकीची किती जमीन आहे? तुमच्या कंपन्यांचा टर्नओव्हर किती आहे ?- हेक्स प्रकल्प संपूर्ण कायदेशीर असल्याचा तुमचा दावा आहे का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2012 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close